वाशिम : पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांची नावं घेण्यात आली आहे. त्यात विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.(case has been registered against BJP leaders at Manora police station in Washim)
या प्रकरणात पूजा चव्हाण या मुलीची तर बदनामी झालीच. पण तिच्या परिवाराची आणि संपूर्ण बंजारा समाजाचीही बदनामी झाली. त्या पीडितेने आत्महत्या केली की काय? याचा तपास पोलीस करत आहेत. पण भाजपच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि तपासात अडथळा निर्माण केला. तसंच कोर्टाच्या निर्णयाची पायमल्ली करत एका स्त्रीची संपूर्ण भारतात जाणून बुजून बदनामी करणाऱ्या संबंधित भाजप नेत्यांवर आणि प्रसार माध्यमांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
मनोरा पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांची नावं घेण्यात आली आहे. भाजप नेत्यांनी पीडित पूजा चव्हाणचे चारित्र्य हनन केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. बंजारा परिषदेने केलेल्या या तक्रारीनुसार मनोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणावरुन भाजप नेत्यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला होता. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला एक शब्दही बोलू देणार नाही, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तर भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला होता. भाजपच्या अन्य नेत्यांनीही या प्रकरणी सरकारवर हल्ले सुरुच ठेवले होते. त्यामुळे सरकारची आणि पर्यायानं शिवसेनेची होणारी नाचक्की रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याचं बोललं जात आहे.
VIDEO : Special Report | पूजाच्या आई-वडिलांना 5 कोटी देऊन तोंड बंद केलं, चुलत आजीचा खळबळजनक आरोपhttps://t.co/pB7JxxSTLi
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
संबंधित बातम्या :
…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडेंचा अप्रत्यक्षरीत्या निशाणा
Sanjay Rathod | संजय राठोड राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेतील ‘राजकीय गुरु’च्या भेटीला
case has been registered against BJP leaders at Manora police station in Washim