मुंबई – राज्यात शिवसेनेला (Shivsena) मोठे खिंडार पडले असताना दुसरीकडे इंदापूरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. विशाल बोंद्रे (Vishal Bondre) असं विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकऱ्यांचे नाव आहे. विशाल बोंद्रे हे पुणे जिल्ह्याचे समन्वयक आहेत. परवा संध्याकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची सचिन अहिर यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक झाली. त्यानंतर लगेच विशाल बोंद्रे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. इंदपूरमध्ये 14 जुलै रोजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. ही बैठक संपल्यावर ग्रुप फोटो काढण्यासाठी उभे राहिले, असता विशाल बोन्द्रे हे महिलेच्या पाठीमागे उभे राहिले आणि महिलेच्या खांद्यावर हात ठेवला होता. त्यावरून महिलेने विशाल बोन्द्रे यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी (Indapur Police) विशाल बोन्द्रे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विशाल बोन्द्रे यांनी गटबाजीतून हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप संबंधित महिलेवर केला आहे. जर 14 जुलै रोजी हा प्रकार झाला होता तर ही महिला इतक्या दिवस शांत का बसली असा देखील सवाल बोन्द्रे यांनी केला आहे. त्यामुळे इंदापूरमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.
एखाद्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी असते. विशेष म्हणजे राजकीय कार्यक्रमात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी पोलिसांना सीसीटिव्ही कॅमेऱ्याची मदत घ्यावी लागणार आहे. फिर्यादी व्यक्तीने आरोप केला आहे. त्याचबरोबर ज्यांच्यावरती आरोप कऱण्यात आला आहे. त्यांनी गटबाजीतून आरोप करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्यावेळी माझ्यावरती गु्न्हा का दाखल करण्यात आला नाही. इतक्या उशिरा तक्रार दाखल का केली आहे असंही आरोप केलेल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आत्ता यावर इंदापूर पोलिस काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं आहे.
शिवसेनेचा एक गट फुटल्यापासून शिवसेनेचं मजबूत संघटन करण्याचं काम नेत्यांकडून सुरु आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी दौरे सुरु केले आहेत. इंदापूर येथील पदाधिकाऱ्यांना ज्यावेळी सचिन अहिर यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळी हे प्रकरण घडल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यावेळी फोटो काढत असताना खांद्यावर हात ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.