मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते राजकीय दसरा मेळाव्याकडे. यंदा शिवसेनेचे एक नाही तर दोन दसरा मेळावे होणार आहेत. शीवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तर, BKC मध्ये शिंदे गट दसरा मेळावा घेणार आहे. दसरा मेळाव्याआधीच शिंदे गटाच्या एका तलावरीची जोरदार चर्चा सुरु आहे.
BKC येथील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी 51 फुटी तलावर ठेवण्यात आली आहे.
दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना 12 फुटी चांदीची तलवार देण्यात येणार असल्याचेही समजते. दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे.
उद्या शिवसेनेचा शिवाजीपार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर मेळावा होणार आहे. ़उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.