Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मायभूमीतच दुहेरी झटका, एकाच दिवशी दोन उमेदवारांची निवडणुकीतून माघार

| Updated on: Mar 23, 2024 | 5:03 PM

वडोदरा मतदारसंघातील भाजप उमेदवार रंजनबेन भट्ट यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ साबरकांठा येथील भाजप उमेदवार भिखाजी ठाकोर यांनीही लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आहे.

Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मायभूमीतच दुहेरी झटका, एकाच दिवशी दोन उमेदवारांची निवडणुकीतून माघार
pm narendra modi, bhikaji thakor and ranjan bhatt
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मायभूमी गुजरातमध्ये त्यांच्याच पक्षाच्या दोन भाजप खासदारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिलाय. एकीकडे उमेदवारी देण्यावरून अनेक नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. अशातच ज्यांना उमदेवारी देण्यात आली आहे अशा उमेदवारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोन्ही उमेदवारांनी आपण निवडणूक लढविण्यास असमर्थ असल्याचे सोशल मिडीयावरून जाहीर केलंय.

वडोदरा मतदारसंघातील भाजप उमेदवार रंजनबेन भट्ट यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ साबरकांठा येथील भाजप उमेदवार भिखाजी ठाकोर यांनीही लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर आता भाजपला नवे उमेदवार निवडावे लागणार आहेत.

रंजनबेन भट्ट यांनी दिले कारण

वडोदरा लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रंजनबेन भट्ट यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यांनीही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. वैयक्तिक कारणांमुळे 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही असे त्यांनी म्हटले आहे. वडोदरा लोकसभा जागेसाठी तिसऱ्यांदा रंजनबेन भट्ट यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांच्या नावाला भाजप नेत्या ज्योतिबेन पंड्या यांनी विरोध केला. भाजपच्या राष्ट्रीय महिला विंगच्या उपाध्यक्षा ज्योतिबेन पंड्या यांनी पक्षाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. तसेच, रंजनबेन भट्ट यांच्या नावाचा निषेध करणारे बॅनरही शहरातील विविध भागात लावण्यात आले होते.

वडोदरा जागा महत्वाची

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि वडोदरा अशा दोन ठिकाणाहून निवडणूक लढविली होती. दोन्ही मतदार संघातून ते विजयी झाले होते. मात्र, त्यांनी वडोदराची जागा सोडली. त्यामुळे येथे झालेल्या पोटनिवडणूक झाली. यात भाजपच्या भट्ट यांनी विजय मिळविला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला होता. आता 2024 च्या निवडणुकीतही त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती.

भिखाजी ठाकोर यांनी का घेतला निर्णय?

भाजपचे आणखी एक घोषित उमेदवार भिखाजी ठाकोर यांनीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. त्यांनी यासाठी वैयक्तिक कारण पुढे केले आहे. ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण निवडणूक लढवू इच्छित नसल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी लिहिले, “मी, भिकाजी ठाकोर, वैयक्तिक कारणांमुळे 2024 ची लोकसभा निवडणूक साबरकांठामधून लढण्यास इच्छुक नाही.”