बीड – बीडमधल्या (Beed) एका शेतकरी महिलेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्राची सगळीकडे चर्चा आहे, कारण त्याचा मुलगा श्रीकांत गदळे हा सध्या समाजकार्य करतोय, त्याला विधान पारिषदेवर आमदार करा असं त्या शेतकरी महिलेचं म्हणणं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. विशेष म्हणचे माझ्या मुलाला तुम्ही आमदार केल्यानंतर तो फक्त एक रुपयाचे मानधन घेईल असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. सगरबाई गदळे (Sagarbai gadale) शेतकरी महिलेचं नाव आहे. गदळे या केज तालुक्यातील दहिफळ गावातील रहिवासी आहेत.
मुख्यमंत्री शिंदे साहेब आपणास पत्र लिहीण्याचे कारण – माझ्या श्रीकांतला आमदार करा – (बाबत ).
मी सागरबाई विष्णु गदळ आपणास विनंती करते की, माझा श्रीकांत गदळ गिल्या अनेक वर्षापासून राज्यातील शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे. मात्र त्याच्याकडे कसलेही पद नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण आपण माझ्या श्रीकांतला आमदार करा, तो 1 रुपया प्रतिमहीना काम करायला तयार आहे. माझ्या श्रीकांतला आमदार होऊन राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. एकलेच नाही तर, महाराष्ट्रातील गरीबी हटवण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून गरीबीमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. हे काम माझ्या -श्रीकांतला करायचे आहेत.
त्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही माझ्या श्रीकांतला आमदार करा. राज्यातील शेतकरी व गोरगरीबांची सेवा करण्यांची संधी दया, जर आपण माझ्या श्रीकांतला ही संधी दिली. तर मी तुमची खुप आभारी राहील. नक्कीच माझा श्रीकांत आपण दिलेल्या आमदारकीचा योग्य वापर राज्यातील जे प्रश्न प्रलंबीत आहेत ते सोडवण्याचा पुर्णता करणार आहे.
या पत्रावर मुख्यमंत्री काय उत्तर देतात, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पत्राची सुध्दा अधिक चर्चा आहे.