नवी दिल्ली : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल यांना भाजपने पंजाबमधील गुरुदासपूर येथून लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. लोकसभा निवडणुकीची तिकीट जाहीर होताच, त्यांनी आपल्या मतदारसंघात रोड शो करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काल दिल्लीतील बाटला येथे एका रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या एका महिला चाहतीने चक्क सनी देओल यांच्या गाडीवर चढून त्यांना किस केला. सध्या याचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सनी देओलने नुकताच भाजपात प्रवेश केलाय. त्याला पंजाबमधील गुरदासपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सनी देओलने अनेक ठिकाणी प्रचार रॅली आणि सभांचे आयोजन केले आहे. नुकतंच सनी देओल यांच्या प्रचारासाठी पंजाबमधील बाटला येथे रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोसाठी तुफान गर्दी जमली होती, सनी देओलला चाहत्यांकडून वेगवेगळ्या भेटवस्तू देण्यात आल्या.
मात्र या रोड शो दरम्यानचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये सनी देओल यांच्या रोड शो वेळी त्यांची एक महिला चाहती गाडीवर चढली. कोणाला काही कळायच्या आत त्या महिलेने सनी देओलला जवळ ओढत त्याच्या गालावर किस केले. त्यांच्या गळ्यात हार घातला. विशेष म्हणजे सनीनेही प्रेमाने तिचा हा किस स्विकारला आणि नंतर या महिलेला खाली उतरण्यास मदतही केली.
सनी देओलने नुकताच भाजपात प्रवेश केलाय. त्याला पंजाबमधील गुरदासपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना इथून खासदार होते. पण त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत इथून काँग्रेसने विजय मिळवला होता. यावेळी भाजपने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी सनी देओलला मैदानात उतरवलंय.
पाहा व्हीडिओ :
#WATCH: Actor-turned-politician Sunny Deol who is the BJP candidate from Gurdaspur Lok Sabha seat was kissed on his cheek by a woman during his roadshow in Batala, Punjab yesterday. pic.twitter.com/YTQvNDzRYL
— ANI (@ANI) May 9, 2019
संबंधित बातम्या :
भाजप प्रवेशानंतर सनी देओलचा पहिलाच रोड शो, चाहत्यांची तुफान गर्दी