मुंबई : (Rebel MLA) बंडखोर आमदारांमुळे पक्षाची झालेली आवस्था आणि त्याच्या यातना काय असतात हे अखेर लपून राहिले नाही. आतापर्यंत बंडखोर आमदारांचा आणि शिवसेनेतील नेत्यांचा असा समोरासमोर संबंध हा आलेलाच नव्हता. पण सोमवारी (Assembly) विधानभवनाच्या परिसरात आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार (Prakash Surve) प्रकाश सुर्वे हे समोरासमोर आले आणि आदित्य ठाकरे यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. माझे तुमच्यावर प्रेम होते, हे तुम्हाला देखील माहित असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे हे भावूक झाले होते. एवढे असतानाही त्यांनी विजयी कऱण्याचे आवाहन केले तर बघा परत विचार करा म्हणत स्वगृही परतण्याचे देखील त्यांनी आवाहन केले आहे. गेल्या आणि वर्षापासून ज्यांच्या सानिध्यात काम केले त्यांच्याबाबतीत अशी भूमिका घेणाऱ्या सुर्वेंचाही यावेळी चेहरा पडला होता.
शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केले असले तरी त्यापैकी 20 आमदार परत येतील असा विश्वास आदित्य ठाकरे हे नेहमी करीत होते. त्यांनी आमदारांसोबत केलेले कार्य आणि रोजचा संबंध यामुळे त्यांना ते वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे काही झालेच नाही. मात्र, बंडखोर हे आपल्या डोळ्यात-डोळे घालून बोलू शकणार नाहीत हे त्यांचे वाक्य खरे झाले. प्रकाश सूर्वे यांच्याशी ते संवाद साधत असताना सूर्वेंचा चेहरा अक्षरश: पडला होता. शिवाय आपण काहीतरी केले याचे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
आदित्य ठाकरे विधानभवनाकडे मार्गस्थ होत असताना त्यांची वाटेत बंडखोर आमदार प्रकाश सूर्वे यांची भेट झाली. आता यांना काय बोलणार असे म्हणत त्यांनी संवादाला सुरवात केली. त्यादिवशी जेवण तयार ठेवलेलं…आम्ही तुमच्याकडे येत होतो.. असं कराल अपेक्षित नव्हतं.. तुमच्यावर खरोखर प्रेम होते, हे तुम्हाला देखील माहिती होते…ठीक आहे..बघा आता विजयी करा…पण मला स्वत:ला दुख झाले..हे तुम्हाला पण माहिती आहे… असा संवाद ते साधत असताना सूर्वे केवळ मानेने होकार देत होते. हा संवाद काही क्षणापूरता झाला असला तरी भावनिक होता हे मात्र खरे.
तुमच्या अशा भूमिकेमुळे पक्षाचे तर नुकसान झालेच आहे पण वैयक्तिक मला देखील दुख: झाल्याचे आदित्य ठाकरे हे सांगत होते तर सूर्वे त्यांचे म्हणणे ऐकूण घेत केवळ मानेने होकार देत होते. या दरम्यानच्या काळात सूर्वे यांना कशा पध्दतीने व्यक्त व्हावे हे देखील समजत नव्हते. अखेर आदित्य ठाकरे यांनीच उरकते घेत तेथून विधानभवनाकडे मार्गस्थ होणे पसंत केले.