मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय. निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी ही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटावर केली आहे. यावरुन पुन्हा एकदा शिंदे आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद उफाळून आल्याचं दिसतंय. आज दिवसभरातून दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे गटावर आदित्य ठाकरे यांच्याकडून टीका करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचं प्रेम घ्यायला आलोय. ठाकरे हे नेहमीच मैदानात आहेत,’ असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत. तर याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधलाय. माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत हे दोन्ही नेते वारंवार एकनाथ शिदे गटाला लक्ष करताना दिसत आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा पाठित खंजीर खुपसल्याचा उल्लेख केला.
निष्ठा यात्रेदरम्यान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधलाय. यावेळी ते म्हणाले की, शिवसैनिकांचं प्रेम घ्यायला आलोय. ठाकरे नेहमी मैदानातच आहेत. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजीर खुपसला, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय. जे निष्ठावान आहेत ते मातोश्रीवर येतील. निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारं सदैव खुली असतील,’ असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.
आज आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर दुसऱ्यांदा निशाणा साधलाय. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करताना स्थगिती सरकार असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की, ‘ हे सरकार पण स्थगिती सरकार होणार का, असा सवाल करत ‘ते आमच्यावर टीका करायेच, आज तेच कामांना स्थगिती देत आहेत,’ असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.
सकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला सुनावताना म्हटलं की, ‘माझ्यावर खास प्रेम करण्याची त्यांना गरज नाही. अन्यथा त्यांनी आमच्या पाठित खंजीर खूपसला नसता. शिवसेना ही आपली आहे आणि चिन्हही आपलेच आसणार आहे,’ असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.