नवी दिल्ली : ईडीकडून (ed) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईडीने संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केले आहे. ईडीच्या कारवाईने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली असतानाच दुसरीकडे ईडीकडून ‘आप’च्या नेत्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. आपचे नेते सत्येंद्र जैन यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात आपचे नेते सत्येंद्र जैन यांची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती इडीकडून देण्यात आली आहे. आज दोन वेगवेगळ्या प्रकरणात इडीने शिवसेना नेते आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांची संपत्ती जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन तसेच आठ फ्लॅट आणि मुंबईतील एका फ्लॅटचा समावेश आहे. तर दुसऱ्या प्रकरणात आपचे नेते सत्येंद्र जैन यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान इडीकडून राऊतांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणा या रजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. दादरमधील राहतं घर जप्त झाले आहे. ही संपत्ती जुनी आहे, कष्टाच्या पैशातून खरेदी केली आहे. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. मी कोणाच्याही बापाला घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज आमचा नंबर आहे, उद्या तुमचाही नंबर असू शकतो. आज राज्य सरकारने मी केलेल्या आरोपांवर एसआयटी स्थापन केली आहे, ही कारवाई नेमकी कशी झाली ते आता तुम्ही समजून घ्या. एक रुपया जरी गुन्हेगारीतून आला असेल तर मी सगळी प्रॉपर्टी भाजपाला दान करेन, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. वेळे सगळ्यांचीच येणार आहे, इथे प्रत्येकाला हिशोब द्यावा लागणार असल्याचे देखील राऊतांनी म्हटले आहे.
इडीने केवळ आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरच कारवाई केलेली नाही, तर आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्यावर देखील कारवाई केली आहे. सत्येंद्र जैन यांच्या परिवाराशी संबंधित तब्बल 4.81 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगचा संशय असल्याने ही संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज इडीकडून करण्यात आलेल्या या दोन मोठ्या करवाईंमुळे आप आणि महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
ED has provisionally attached immovable properties
worth Rs. 4.81 Crore belonging to M/s Akinchan Developers Pvt. Ltd. ,M/s Indo Metal impex Pvt Ltd & others under PMLA, 2002 in a disproportionate assets case of Satyendra Kumar Jain & others.— ED (@dir_ed) April 5, 2022
मला उत्तरप्रदेशातल्या उन्नावमध्ये मला भीती वाटली, कारण तिथे योगी सरकार आहे – प्रणिती शिंदे