नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे देशभराचं लक्ष लागलं आहे. मागील विधानसभेत काँग्रेस आणि भाजपचा धुव्वा उडवत सत्तेत आलेल्या आपने पहिल्याच यादीत सर्वच्या सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली (AAP and BJP Candidate List for Delhi Assembly Election). दुसरीकडे भाजपने शुक्रवारी (17 जानेवारी) पहिली यादी जाहीर 57 उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे भाजपने अद्यापही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. हाच मुद्दा पकडत भाजपची पहिली यादी जाहीर होताच आपने भाजपला केजरीवाल यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न विचारला आहे (AAP and BJP Candidate List for Delhi Assembly Election).
भाजपने दिल्लीतील 70 पैकी 57 जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. यात 11 उमेदवार अनुसूचित जातीचे (SC) असून 4 महिलांचा समावेश आहे. या यादीत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या मतदारसंघातून आपकडून स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवडणूक मैदानात आहेत. यावर आपने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत भाजपने केजरीवाल यांच्या विरोधात आपल्या उमेदवाराची घोषणा केली का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच दिल्ली भाजपकडे याचं उत्तर आहे का? असंही म्हटलं. आपने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तीन हिंदी गाण्यांचा काही भाग घेत नाही, नाही असं म्हटलं आहे.
दिल्ली विधानसभा चुनाव-2020 के लिए भाजपा के 57 उम्मीदवार घोषित, सभी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं..#BJPWinningDelhi pic.twitter.com/E0adDaf47s
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 17, 2020
दरम्यान, आम आदमी पक्षाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व 70 उमेदवारांच्या नावाची घोषणा पहिल्याच यादीत केली. यात आपने 46 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली, तर 15 विद्यमान आमदारांचं तिकिट कापण्यात आलं आहे. 9 जागांवर आपने नव्या उमेदवारांनाही संधी दिली आहे. आपने यावेळी 8 महिला उमेदवारांना उमेदवारी दिली.
Important Announcement :
Aam Aadmi Party declares all 70 candidates for the upcoming Delhi election.
We congratulate all the candidates and wish them all the best to establish high levels of trust and integrity within their constituency.#AAPKeCandidates pic.twitter.com/mbby8Z2GCR
— AAP (@AamAadmiParty) January 14, 2020
दुसरीकडे भाजपने मागील उमेदवारांपैकी 26 नेत्यांची तिकिटं कापली. यात भाजप दिल्लीचे माजी उपाध्यक्ष आणि रिठाला मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या कुलवंत राणा यांचाही समावेश आहे. भाजपने अजून नवी दिल्ली, महरौली, संगम विहारसह 13 जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली नाही. भाजपने 2015 मध्ये निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांना यावेळी तिकिट दिलेलं नाही.
संबंधित बातम्या :
केजरीवाल यांच्याविरोधात 9 रुपये रोकड असणारा ‘आम आदमी’ निवडणूक रिंगणात