‘आप’ आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार, निकालानंतर हल्ला, कार्यकर्त्याचा मृत्यू

| Updated on: Feb 12, 2020 | 7:58 AM

'आप'चे आमदार नरेश यादव यांच्यावरील हल्ल्यात कार्यकर्ते अशोक मान यांचे निधन झाले आहे.

आप आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार, निकालानंतर हल्ला, कार्यकर्त्याचा मृत्यू
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या ‘आम आदमी पक्षा’च्या आमदारावर गोळीबाराची घटना (AAP MLA Naresh Yadav Attack) घडली आहे. मेहरुलीचे आमदार नरेश यादव यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडण्यात आला. या घटनेतून यादव बालंबाल बचावले असले, तरी ‘आप’चा कार्यकर्ता मृत्युमुखी पडला आहे.

‘आप’चे आमदार नरेश यादव आणि कार्यकर्ते मंदिरातून परत येत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारात जखमी झालेल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याचं निधन झालं, तर एक जण जखमी झाला” असं ट्वीट पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलं आहे.

‘आप’चे आमदार नरेश यादव यांच्यावरील हल्ल्यात कार्यकर्ते अशोक मान यांचे निधन झाले आहे. आज आम्ही आमच्या कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो’ असंही पुढे ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांनी या हल्ल्याचा (AAP MLA Naresh Yadav Attack) सखोल तपास करावा, हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासावे, अशी मागणी यादव यांनी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्याच्या दिवशीच हा प्रकार घडला.

‘ही घटना खरोखर दुर्दैवी आहे. मला हल्ल्यामागील कारण माहित नाही. बंदुकीच्या अंदाजे चार फैरी झाडण्यात आल्या. मी ज्या वाहनात होतो, त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मला खात्री आहे की पोलिसांनी योग्य चौकशी केली तर ते हल्लेखोरांना शोधू शकतील’ अशी प्रतिक्रिया नरेश यादव यांनी ‘एएनआय’कडे व्यक्त केली.

“ज्या दोघांना गोळ्या लागल्या, त्या अशोक मान यांचा मृत्यू झाला, तर हरेंदरजी जखमी झाले. त्यांनी मला लक्ष्य केलं का, हे माहिती नाही. माझ्यासह या हल्ल्यात कोणालाही गोळ्या लागल्या असत्या” अशी भीतीही त्यांनी व्यक्त (AAP MLA Naresh Yadav Attack) केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 62 जागांवर विजय मिळवला आहे, तर भाजपला केवळ आठ जागा जिंकता आल्या. काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक केली आहे.