मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्वतः चहा घेत असताना अब्दुल सत्तार यांनी एका अधिकाऱ्याला ‘दारु पिता का?’ असा प्रश्न विचारला. कृषीमंत्र्यांचा हा व्हिडीओ (Abdul Sattar Video) समोर आल्यानंतर त्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी हा व्हिडीओ ट्वीट करुन अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावरुन सवाल उपस्थित केला आहे. हा अतिवृष्टी पाहणी दौरा की मद्यसृष्टी पाहणी दौरा? असा प्रश्न त्यांनी अब्दुल सत्तार यांना उपस्थित केला आहे.
अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो ? pic.twitter.com/UDZsfypmAO— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022
21 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान नेतेमंडळी, अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत ते एका ठिकाणी चहा घेत होते. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेला हा अजब प्रश्न आता चर्चेत आला आहे.
चहा घेण्यास नकार दिलेल्या जिल्हाधिकाऱ्याला अब्दुल सत्तार यांनी ‘दारु पिता का?’ असं प्रश्न विचारला. खोचकपणे विचारलेल्या या प्रश्नावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केलीय.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज ठाकरे यांनीही पत्र लिहून तशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती.
दरम्यान, गुरुवारी आदित्य ठाकरे यांनीदेखील नाशिक आणि पुणे जिल्ह्याचा दौरा केला होता. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, शिंदे गटातील नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर सडकून टीकाही केली होती.