माझे मालक तुम्हीच.. तुम्ही बटण दाबता म्हणून मला मुंबईत बोलता येतं, तुफ्फान टीकेनंतरही सत्तार यांची भाषणबाजी!

| Updated on: Nov 08, 2022 | 3:41 PM

आताचे मुख्यमंत्री ऑलराउंड आणि अष्टपैलू आहेत. सर्व समाजाला एकत्र घेऊन आणि सर्व समाजाला न्याय देण्यासाठीच ते काम करतात, अशी स्तुती त्यांनी केली.

माझे मालक तुम्हीच.. तुम्ही बटण दाबता म्हणून मला मुंबईत बोलता येतं, तुफ्फान टीकेनंतरही सत्तार यांची भाषणबाजी!
Image Credit source: social media
Follow us on

कुणाल जायकर, औरंगाबादः सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) शिवीगाळ करण्यावरून अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अवघ्या महाराष्ट्रातून टीकेची झोड उठली आहे. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अद्याप पूर्णपणे माफी मागितलेली नाही. तर ठरलेल्या ठिकाणी सत्तार यांची तुफ्फान भाषणबाजी चालूच आहे. औरंगाबादमधीलच (Aurangabad) एका कार्यक्रमात सत्तार म्हणाले, जो काम करतो, लोक त्यालाच नाव ठेवतात. ज्या झाडाला फलं असतात, लोक त्यालाच दगड मारतात. पण माझे मालक तुम्ही आहात. तुम्ही बटण दाबता म्हणून मला मुंबईत बोलता येतं… अब्दुल सत्तार यांचं आजचं हे वक्तव्य अधिकच चर्चेत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील बौद्ध धम्म परिषद कार्यक्रमाला कृषीमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. सिल्लोडमधील फरदापूरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

धम्म परिषदेच्या निमित्ताने अमेरिका आणि जपानमधून आलेल्या पाहुण्याचं त्यांनी स्वागत केलं. लवकरच येथे जागितक दर्जाचं धम्म केंद्र होतंय. त्यासाठी मी निधी कमी पडू देणार नाही, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं.

तसंच आज मी कुणावर टीका करत नाही, कारण मी जरा काही बोललो की ते व्हायरल होतं, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी करताचा उपस्थितात हशा पिकला.

सिल्लोड येथील फरदापूर येथे पाच हजार कोटींचं पाली विद्यापीठ होणार आहे. जगातील हे पहिलं पाली विद्यापीठ असेल, अशी घोषणा अब्दुल सत्तार यांनी केलं. यावेळी बोलताना त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुकही केलं.

आताचे मुख्यमंत्री ऑलराउंड आणि अष्टपैलू आहेत. सर्व समाजाला एकत्र घेऊन आणि सर्व समाजाला न्याय देण्यासाठीच ते काम करतात, अशी स्तुती त्यांनी केली.