जालना : आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा खुद्द काँग्रेस प्रदेशाध्य अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत केली. आज जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये विलास औताडे यांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
“जोपर्यंत अब्दुल सत्तार पक्षात होते तोपर्यंत त्यांचा मान राखला. मात्र तुम्हाला उमेदवारी देऊनही तुम्ही जर आमूक व्यक्तीला उमेदवारी द्या अशी भूमिका जर घेत असाल, तर ते पक्षाला मान्य नाही. त्यामुळं पक्षाविरोधात भानगडी करत असलेल्या अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करत आहे” अशी घोषणा अशोक चव्हाण यांनी केली.
VIDEO : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, अशोक चव्हाणांची जाहीर सभेत घोषणा @AshokChavanINC pic.twitter.com/U8cj9lJwB9
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2019
आता विषय संपलेला असून आम्ही जो अधिकृत उमेदवार दिला आहे, त्यांच्या पाठिशी तुम्ही उभे राहा, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं.
काँग्रेस हरलीय, चंद्रकांत खैरेंना हरवण्यासाठी हर्षवर्धनला पाठिंबा : अब्दुल सत्तार
काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. काँग्रेसने सुभाष झांबड यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. मात्र झांबड यांना उमेदवारी देताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर सत्तार यांनी झांबड यांच्याविरोधात उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेतला.
औरंगाबादेत तिहेरी लढत
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, तर वंचित बहुजन आघाडीकडून आमदार इम्तियाज जलील रिंगणात आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड लढत आहेत. औरंगाबादमध्ये 23 एप्रिलला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
कोण आहेत अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.
संबंधित बातम्या
काँग्रेस हरलीय, चंद्रकांत खैरेंना हरवण्यासाठी हर्षवर्धनला पाठिंबा : अब्दुल सत्तार
खैरेंविरोधात एल्गार, असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत चार दिवस तळ ठोकणार
अब्दुल सत्तार रावसाहेब दानवेंच्या भेटीला
अब्दुल सत्तार यांची माघार, काँग्रेसला विरोध कायम, मदत कुणाला?
आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर?
राशीतून चंद्रमा फिरतोय, चंद्रकांत खैरेंकडून दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल