मुंबई : सध्या राज्यातील राजकीय पक्ष विधान परिषदेसाठी शेवटची जुळवाजुळव करत आहेत. तर अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यासाठी आवश्यक आमदार खासदाराचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी त्यांनी महत्वपूर्ण विधान केलंय. “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीअध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल”, असं बिचुकले म्हणालेत.
“राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीअध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल. पवारांचं आमदार ऐकतात. मला आमदारांच्या सह्या मिळतील आणि माझा राष्ट्रपती होण्याचा मार्ग सोपा होईल. मी राष्ट्पती होऊ शकतो”, असं बिचुकले म्हणालेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
महाविकास आघाडीमध्ये चाललेल्या राजकीय रस्सीखेचविषयी विचारलं असता ते म्हणाले की, “सध्या महागाई वाढतेय. त्यावर कुणीही बोलत नाही. याची प्रॉपर्टी किती त्याची प्रॉपर्टी किती यावरून तुम्ही भांडत आहात हे बरोबर नाही. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या.”
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी तशी घोषणा केली आहे. त्यासाठी ते ठरवून दिलेल्या आमदार खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि लवकरच अर्ज देखील दाखल करणार आहेत.
अभिजीत बिचुकले हे आपल्याला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसले होते. यात त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. शिवाय ते बिग बॉस हिंदीच्या 15 व्या सिझनमध्येही दिसले होते. त्यांनी याआधीही अनेक निवडणुका लढवल्या आहेत. याआधीही त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आहे. शिवाय उदयनराजेंच्या विरोधातही निवडणूक लढवली आहे.