लातूर : भाजपा-सेना युतीच्या संभाव्य सरकारमध्ये मंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून स्थान मिळते का? यासाठी बहुतांश आमदारांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी अनेकांकडून जोरदार लॉबिंग करताना पाहायला मिळत (Abhimanyu Pawar get Ministry) आहेत. तर निवडून आलेले काही आमदार मतदारसंघात कामाला लागले आहेत. लातूरमधील औसा येथून निवडून आलेले भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची संभाव्य मंत्री म्हणून (Abhimanyu Pawar get Ministry) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अभिमन्यू पवार यांची ओळख आहे. त्यामुळे मंत्री म्हणून अभिमन्यू पवार यांचा नंबर लागू शकतो अशी चर्चा सुरु आहे. मात्र अभिमन्यू पवार यांनी या चर्चेत न पडता मतदारसंघात जाऊन लोकप्रतिनिधींच्या कामांना पसंती दिली Abhimanyu Pawar get Ministry) आहे.
लातूरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अभिमन्यू पवार यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन शेती-पिकांचं नुकसान समजून घेतले आहे. प्रत्येक गावागावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
अगोदर दुष्काळाने अडचणीत असलेला औसा तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झाला आहे. सोयाबीन, कांदा, कोथिंबीर, मूग, उडीद, भूईमूग यासाठी अनेक पिक होत्याची नव्हती झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक पाठबळाची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे ही बाब लक्षात घेऊन नवनिर्वाचित आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांध्याची पाहणी केली. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत (Abhimanyu Pawar get Ministry) आहे.
अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस नेते बसवराज पाटील यांचा पराभव केला. अभिमन्यू पवार यांना 95 हजार 340 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या बसवराज पाटील यांना 68 हजार 626 मतांवर समाधान मानावं लागलं. अभिमन्यू पवार यांनी बसवराज पाटील यांचा 26 हजार 714 मताधिक्याने पराभव केला.
संबंधित बातम्या :
विधानसभा निकाल 2019 : औसामध्ये मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार विजयी
अभिमन्यू पवारांना विरोध, संभाजी निलंगेकरांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर