मुंबई : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर ममतादीदींनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (Actor Riteish Deshmukh congratulates West Bengal CM Mamata Banerjee on victory)
रितेश हा महाराष्ट्राचे माजी (दिवंगत) मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा धाकटा सुपुत्र. विलासरावांनी मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी (मे 2009 मे 2012) सांभाळली आहे. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची (मे 2009 ते मे 2011) धुरा होती. त्यामुळे रितेशने आपल्या वडिलांच्या सहकारी असलेल्या बॅनर्जींनाच शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेशचे ट्वीट काय?
तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल ममताजी (दीदी) यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांचा विजय
विलक्षण होता. तृणमूल काँग्रेसच्या बाजूने प्रचंड जनादेश होता, अशा आशयाचे ट्वीट रितेशने केले आहे.
Many congratulations to @MamataOfficial ji (Didi) on being sworn-in as the Chief Minister of West Bangal for the 3rd time. Her win was stupendous and the public mandate was huge in the favour of @AITCofficial. pic.twitter.com/ts08w5lLz8
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 6, 2021
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 292 पैकी तब्बल 213 जागांवर विजय संपादित करत एकहाती बहुमत मिळवलं आहे. 205 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला मात्र 77 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. (Actor Riteish Deshmukh congratulates West Bengal CM Mamata Banerjee on victory)
नंदिग्राममध्ये पराभवाचा धक्का
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला पूर्ण बहुमत मिळालं असलं तरी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झाला. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता यांना 1953 मतांनी पराभूत केले.
भाजपचं तगडं आव्हान मोडून काढत ममता बॅनर्जी यांनी राज्यात एकहाती सत्ता मिळवली. त्यांनी 2016 पेक्षा चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. मात्र स्वतःचा पराभव झाल्यामुळे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पुढील सहा महिन्यात आमदार बनणं गरजेचं आहे.
ममता बॅनर्जी या सलग तिसऱ्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या आहेत. पहिल्यांदा 2011 मध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी 34 वर्षे सत्ते असलेल्या डाव्यांना खुर्चीवरुन खाली खेचलं होतं. त्यावेळी ममता यांचा टाईम्सच्या जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश झाला होता. त्यानंतर 2016 मध्ये दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या.
संबंधित बातम्या :
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशचा भावनिक व्हिडिओ
West Bengal Result : पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शून्यावर!
(Actor Riteish Deshmukh congratulates West Bengal CM Mamata Banerjee on victory)