अहमदनगर: शिवसंग्राम संघटनेच्या महिला अध्यक्षा आणि सिनेअभिनेत्री दीपाली सय्यदने भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. दीपाली सय्यदने लोकसभा निवडणुकीसाठी सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार असल्याचं दीपाली म्हणाली.
सुजय विखे साकळाई पाणी योजना पूर्ण करतील, त्यामुळे विखेंना पाठिंबा देत असल्याचं दीपाली सय्यदने सांगितलं. साकळाई पाणी योजनेसाठी मी पाठिंबा दिला आहे. ते पूर्ण होणार असेल तर सोशल मीडियातून प्रचार करेन, असं दीपाली सय्यदने सांगितलं.
दीपाली सय्यद मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून नगर दक्षिणच्या उमेदवार होत्या. मात्र आम आदमी पार्टी ही दिल्ली पुरती मर्यादित आहे. त्यामुळे मी आपचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसंग्राममध्ये प्रवेश केला, असं दीपाली सय्यदने सांगितलं.
कोण आहे दीपाली सय्यद?
सुजय विखे यांचा अर्ज दाखल
दरम्यान, सुजय विखे पाटील यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांच्यात लढत होत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लढतींपैकी एक लढत म्हणून, राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे.
संबंधित बातम्या
उमेदवारी अर्ज भरताना आई-वडिलांची अनुपस्थिती, सुजय विखे गहिवरले
सोलापूर, माढ्यात आघाडीला धक्का, आणखी एका बड्या नेत्याचा भाजप प्रवेश ठरला