मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) चर्चेत आली होती. अनुरागने लैंगिक शोषण केल्याचा दावा करणाऱ्या पायलने आपल्यला न्याय मिळावा असे म्हणत अनेक खटाटोप केले होते. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरही अनुरागची चौकशी न झाल्याने तिने थेट राज्यपालांकडे धाव घेतली होती. यात सगळ्यात तिला आरपीआयचे सर्वेसर्वा डॉ.रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आता पायलने हाती आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात प्रवेश केला आहे.(Actress Payal Ghosh joins Union Minister Ramdas Athawale-led Republican Party of India)
रामदास आठवलेंनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायलचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. पायल घोषसह अभिनेत्री कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकूर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
Maharashtra: Actor Payal Ghosh joins Union Minister Ramdas Athawale-led Republican Party of India (A), in Mumbai.
She has been named as the vice president of women’s wing of RPI (A). pic.twitter.com/slRLOKtJWV
— ANI (@ANI) October 26, 2020
या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी पायलचा पक्षप्रवेश जाहीर केला. ते म्हणाले, ‘पायल घोषवर अन्याय झाला होता. तिने अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पायलवर अन्याय झाल्याने आपण तिची बाजू घेतली, आंदोलन केले, राज्यपालांना भेटलो. यानंतर याप्रकरणात पुढच्या हालचाली सुरू झाल्या.’ (Actress Payal Ghosh joins Union Minister Ramdas Athawale-led Republican Party of India)
मात्र, पोलिसांनी अद्याप अनुरागला अटक केली नाही. त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. यासगळ्यात आम्ही पायलसोबत आहोत. पायलसाठी आम्हाला थेट पश्चिम बंगालहून फोन आले. म्हणूनच आम्ही पायलला पाठिंबा देत आहोत. अनुरागला अटक व्हावी ही आमची मागणी असून, आता पायल आरपीआय पक्षात प्रवेश करते आहे’, असे रामदास आठवले या पत्रकार परिषदेत म्हणाले.
‘ज्यांनी अनुराग कश्यपला केलंय घायल, तिचं नाव आहे पायल’, असे म्हणत आपल्या खास कवी शैलीत रामदास आठवलेंनी पायल घोषचे पक्षात स्वागत केले आहे.
या पत्रकार परिषदेत पायलने देखील आपले मनोगत मांडले आहे. ‘रामदास आठवलेंनी नेहमीच माझी बाजू घेतली. त्यासाठी मी सरांची आभारी आहे. त्यांनी मला नेहमीच मदत केली. त्यांनी महिलांना नेहमी पाठिंबा दिला आहे, म्हणूनच मी आरपीआय पक्षात सहभागी होण्याचे ठरवले आहे. जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी पक्षाच्या माध्यमातून देशासाठी काम करणार आहे. आपण आपल्या देशासाठी काही करू शकलो तर त्यात मला आनंद आहे’, असे पायल घोष यावेळी म्हणाली.
अभिनेत्री पायल घोषचा आरपीआय (A) मध्ये प्रवेश
LIVE TV: https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/KKy1yeruBf— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2020
(Actress Payal Ghosh joins Union Minister Ramdas Athawale-led Republican Party of India)