आमदार पळवले आता प्रकल्पही पळवला; आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Sep 14, 2022 | 9:57 PM

प्रक्लप कसा गेला याचा खुलासा का झालेला नाही असे म्हणत  जितके हार ने वाले को खोके सरकार  कहते है... असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.  

आमदार पळवले आता प्रकल्पही पळवला; आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Follow us on
मुंबई : वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर ह्ललाबोल केला आहे. आमदार पळवले आता प्रकल्पही पळवला असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.
वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टर हा प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याचे अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन सांगितले. हा प्रकल्प सुमारे पावणे दोन लाख कोटींचा होता. याच्याशी संबंधित 160 इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून 70 हजार रोजगार निर्मिती होणार होती.
हा प्रकल्प गुजरातला गेल्यांनतर महाराष्ट्रात मोठं राजकीय वादंग उठले आहे. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त केला आहे.
या प्रकल्पाचे कागदपत्र तयार होते. अर्थात केंद्र सरकार राज्य सरकार या दोघांची सबसिडी मिळून वेदांत आणि फॉसकॉनने थोडी इनव्हेस्टमेंटची सांगड घालणं गरजेची होती. याबाबत चर्चा पुढे गेली होती.
जूनमध्ये भेट घेतली. त्याच्यानंतर आपलं सरकार चाळीस गद्दारांनी पाडलं. यामुळे हा विषय मागे राहिला असं म्हणत आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील एक लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही याची जबाबदारी कोण घेतय याचे उत्तर व्यवस्थे कडून मिळालेले नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.
प्रक्लप कसा गेला याचा खुलासा का झालेला नाही असे म्हणत  जितके हार ने वाले को खोके सरकार  कहते है… असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.