चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) 10 मार्चनंतर पडणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील सरकार आपल्या ओझ्यानं पडेल असं सातत्यानं सांगतात. यावरुन युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीस आणि भाजपला जोरदार टोला लगावलाय. सरकार गेल्यापासून दोन वर्षात फडणविसांमध्ये फ्रस्ट्रेशन आलं आहे. विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे. कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. मात्र, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय. ते आज चंद्रपूर दौऱ्यावर होते.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली असून, त्यांची चौकशी सुरु आहे. अशावेळी संजय राऊत यांनीही ईडीच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर अजून दोन पत्रकार परिषद घेत भाजपची पोलखोल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या मुद्दावर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता आम्ही सगळे संजय राऊत यांच्या सोबत आहोत, तिन्ही पक्ष एकमेकांच्या सोबत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आज मंत्री @VijayWadettiwar जी व आमदार किशोर जोर्गेवार जी यांच्यासह तलावाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 13, 2022
दरम्यान, आदित्य ठाकरे आज चंद्रपूर दौऱ्यावर होते. शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाच्या काठाशी त्यांनी तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाची पाहणी केली. ईको प्रो पर्यावरण संस्थेच्यावतीने गेली काही वर्षे या ऐतिहासिक तलावाला इकोर्निया- सांडपाणीमुक्त करून वैभव प्राप्त करण्याचा लढा उभारला होता. यासाठी मागील डिसेंबर महिन्यात उपोषणही करण्यात आलं होतं. यासंदर्भात पर्यावरण, पर्यटन, खनिज विकास निधी, जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून एक मोठा आराखडा तयार करण्यात आला. सुमारे 50 कोटी रुपयांच्या एकूण कामातील पहीला टप्पा सुरू झाला आहे.
रमाळा तलाव पाहणी दरम्यान येथे जवळच असलेल्या महिला बचत गटाच्या पर्यावरण स्नेही वस्तूंच्या स्टॉलला भेट दिली. pic.twitter.com/Mkq9DHqdtr
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 13, 2022
आपल्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी ईको प्रो संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गोंडकालीन 12 किलो मीटर लांब किल्ला परकोट ‘हेरिटेज वॉक’च्या बगड खिडकी टप्प्याची पाहणीही केली. विशेष बाब म्हणते आदित्य ठाकरे या वॉकमध्येही सहभागी झाले. त्याचबरोबर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण विभागाच्या आढावा बैठकीतही सहभाग घेतला.
बगड खिडकी, चांदा किल्ला येथे स्वच्छता अभियानाची पाहणी केली. आपल्या ऐतिहासिक वारस्याचे संवर्धन करणारी ही मोहीम अतिशय महत्त्वाची असून संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. pic.twitter.com/CSyq8UqmvF
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 13, 2022
इतर बातम्या :