रत्नागिरी : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा आहे. आदित्य यांच्या सुरक्षेसाठी राज्याच्या गृहविभागाने सुरक्षा रक्षक दिलेत. पण त्यांना गाड्या दिलेल्या नाहीत. यावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलंय. माझ्या सुरक्षेसाठी किती सुरक्षारक्षक द्यायचे, त्यांना गाड्या द्यायच्या की नाही. हा प्रश्न पूर्णपणे सरकारचा आहे. त्यांची ती जबाबदारी आहे. माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. त्यांच्याच भरोश्यावर हा दौरा करतोय, असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Security) म्हणालेत.