Video | …आणि आदित्य बोलत असतानाच सेना आमदारानं मास्क चढवला!

| Updated on: Jan 25, 2021 | 8:33 AM

आदित्य ठाकरे यांनी जसाही 'मास्क' शब्द उच्चारला त्यानंतरच्या पुढच्या सेकंदाला प्रकाश सुर्वे यांनी आपल्या तोंडावर मास्क चढवला.

Video |  ...आणि आदित्य बोलत असतानाच सेना आमदारानं मास्क चढवला!
Follow us on

मुंबई :  कोरोना संसर्गाच्या काळात तसंच सार्वजनिक कार्यक्रमात मास्क परिधान करणं हा आता नियम झाला आहे. पण अनेकदा हा नियम अनेकजण पाळत नाही, याला राजकारणी तरी कसे अपवाद असतील. असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय… तो व्हिडीओ आहे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाचा आणि सेना आमदार प्रकाश प्रकाश सुर्वे यांच्या लगबगीचा…! (Aditya Thackeray talking About mask, While MLA Prakash Surve wear mask Video Viral)

कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क किती जरुरी आहे, याचं महत्त्व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मीडियासमोर सांगत होते. मात्र त्याचवेळी आदित्य ठाकरे यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या सेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी मास्क घातला नव्हता. आदित्य ठाकरे यांनी जसाही ‘मास्क’ शब्द उच्चारला त्यानंतरच्या पुढच्या सेकंदाला प्रकाश सुर्वे यांनी आपल्या तोंडावर मास्क चढवला. झालेल्या गमतीचा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आला आणि एकच खसखस पिकली. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

अन् लगबगीने आमदार सुर्वे यांनी तोंडावर मास्क चढवला…

मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कांदिवलीत फायर स्टेशनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवा साधला. या संवादात त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा उपयोग किती आवश्यक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित प्रकाश सुर्वे यांच्या तोंडावर नव्हता. आपला नेता मास्कवर बोलतोय आणि आपल्याच तोंडावर मास्क नाही, हे आमदार सुर्वे यांच्या लक्षात आलं. आदित्य यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत लगबगीने सुर्वे यांनी आपल्या तोंडावर मास्क चढवला.

आमदार सुर्वे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आमदार सुर्वे यांची चूक त्यांना काही क्षणात लक्षात येताच त्यांनी गडबडीत तोंडावर मास्क चढवला. सुर्वेंची लगबग उपस्थितांच्या लगेचच लक्षात आली आणि तिथे हास्यकल्लोळ उडाला. आदित्य ठाकरे यांनाही घडलेला मजेशीर प्रकार लक्षात आला. यावेळी त्यांना स्वत:लाही हसू अनावर झालं.

 

हे ही वाचा :

पालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना

नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन

BEST | खासगीकरणाला विरोध करणारी मुंबईकरांची ‘बेस्ट’ भाडेतत्वावर बसेस घेणार