पुणे : गेल्या एक महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडाने शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला. मातोश्रीवर रोज नेत्यांच्या ही बैठका पार पडतायेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्वतः मैदानात उतरत महाराष्ट्र पैंजण काढायला सुरुवात केली आहे अलीकडेच आदित्य ठाकरे यांचा कोकण आणि मराठवाडा दौरा पार पडलाय. या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता आदित्य ठाकरेंचा पुणे दौरा सुरू आहे. आदित्य ठाकरेंचे पुणे दौऱ्यात भाषण करताना सचिन अहिर यांनी बंडखोर आमदारांवर तूफान टीका केलीय. एकेकाळी जे मंत्री होण्यासाठी रडत होते, पाय धरत होते ते आज विचारतायेत आदित्य ठाकरे कोण? मात्र तुम्हाला आत्ता सांगतो आदित्य ठाकरे हा एक दिवस तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका सचिन आहिर यांच्याकडून करण्यात आली.
तसेच पुण्यातले शिवसेना नेते रघुनाथ कुचिक हे पुन्हा बॅक इन ॲक्शन मोडमध्ये आलेत. यावेळी टीका करताना सचिन आहिर म्हणाले, पुरंदर तालुक्यातील झोपे गेलेला एकजण जागा झाला. तर त्यांनी पुरंदर मध्ये आज शहाजी बापू पाटलांच्या भाषणाचाही समाचार घेतला आहे. बापू तुमचं वागणं बरं नाही. ज्या ताटात जेवला त्याच ताटात मिठाचा खडा टाकला. जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा भाषेत त्यांनी शहाजी पाटलांनाही इशारा दिलाय.
तसेच जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रात येऊन पहावं शिवसेना संपली आहे का? ही गर्दी पाहून ठरवावं असं थेट आव्हान त्यांनी जेपी नड्डांना त्यांनी दिलं. दोन दिवसांपूर्वीच घराणेशाहीच्या पार्ट्या संपत आल्या आहेत, असे म्हणत जे पी नड्डांनी शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या डिवचलं होतं. ट
तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हेही बंडखोरांना रोज गद्दार आहेत. तुमच्या दम असेल तर राजीनामे द्या आणि पुन्हा निवडणुकांच्या मैदानात उतरा. त्यावेळेस तुम्हाला कळेल शिवसेना कुणाची आहे असे थेट आव्हान देत आहेत. त्यावरूनच आता बंडखोर आमदार आदित्य ठाकरे यांना तशाच भाषेत प्रत्युत्तर देत आहेत, त्यामुळे हा सामना अधिक रंगतदार होताना दिसून येत आहे. हा वाद दिवसेंदिवस शिगेला पोहचताना राज्यातली जनात पाहत आहे.