Eknath Shinde : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच नव्हे तर मुंबई- ठाणेनंतर आता ‘या’ शहारातही बंडाचे लोण..!

| Updated on: Jul 07, 2022 | 6:59 PM

आगामी काळात राज्यातील महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याअनुशंगाने सध्या शिवसेनेत होत असलेले बंड हे परिणामकारक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत आमदारांनी पक्ष सोडून थेट शिंदे गटात प्रवेश केला होता. पण हे इथपर्यंतच मर्यादित राहिले नाहीतर नगरसेवक आणि पदाधिकारी देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत असल्याचे चित्र आहे.

Eknath Shinde : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच नव्हे तर मुंबई- ठाणेनंतर आता या शहारातही बंडाचे लोण..!
उद्धव ठाकरे,
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई :  (Shivsena) शिवसेनेतील बंड हे केवळ आमदारांपुरतेच मर्यादित राहिले नाहीतर आता नगरसेवक, पदाधिकारी देखील यामध्ये सहभागी होत आहेत. आतापर्यंत मुंबई आणि ठाणे मध्ये शिवसेनेतील बंडखोरांची संख्या वाढत होती. विशेष म्हणजे पक्ष नेतृत्व हे मुंबईतच असताना असा प्रकार सुरु होता तर मुंबई, ठाणे वगळता इतरत्र शहारांध्ये (Rebel) बंडाचे लोण अधिक नव्हते. पण (Pune) पुण्यामध्ये देखील सेनेला खिंडार पडणार असेच चित्र आहे. कारण सेनेचे नगरसेवक आणि काही पदाधिकारी हे एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत. घराचे वासे फिरले की घरही बदलते अशीच काहीशी अवस्था आता शिवसेनेची होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोरीच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आमदारांपासून सुरु झालेले बंड हे आता नगरसेवक आणि थेट पदाधिकाऱ्यांपर्यंत येऊन ठेपल्याने रोखायचे कसे असा सवाल नेतृत्वापुढे आहे.

महापालिका निवडणुकीवर परिणाम

आगामी काळात राज्यातील महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याअनुशंगाने सध्या शिवसेनेत होत असलेले बंड हे परिणामकारक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत आमदारांनी पक्ष सोडून थेट शिंदे गटात प्रवेश केला होता. पण हे इथपर्यंतच मर्यादित राहिले नाहीतर नगरसेवक आणि पदाधिकारी देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत असल्याचे चित्र आहे. ठाणे, नवी मुंबई येथे तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावरच याला सुरवात झाली होती. पण आता पुण्यामध्ये केवळ नगरसेवकच नाही तर पदाधिकारीही बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे शिवसेनेला पुण्यामध्येही मोठे खिंडार पडणार की काय अशी स्थिती आहे.

शनिवारी होणार चित्र स्पष्ट

नगसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची घोषणा ही शनिवारी केली जाणार आहे. शिंदे गटाकडे आता सर्वांचाच कल वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. असे असतानाही बंडखोरीला काही ब्रेक लागताना दिसत नाही. पक्ष प्रमुखांनी मुंबईत लक्ष केंद्रित केले असले तरी आता नाशिक, पुणे यासारख्या शहरांमध्ये गळती सुरु आहे. याबाबत पुणे नगरसेवक आणि पदाधिकारी हे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

हे सुद्धा वाचा

पदाधिकारीही शिंदेंच्या गटात

आमदार, नगरसेवक इथपर्यंत बंड होईल असे मानले जात होते पण आता पदाधिकारीही बंडामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे संघटनेवर त्याचा थेट परिणाम होत असून ही बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. शनिवारी पुण्यातील नगरसेवकांसह शाखाप्रमुख देखील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकांवर याचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.