नागपूर : नुकताच राज ठाकरेंचा (Raj Thackeray) कार्यकर्त्याला मलम लावून देताना व्हिडीओ (Video) समोर आला होता. त्यानंतर आता नितीन गडकरींही (Nitin Gadkari) चर्चेत आले आहेत. आपल्या एका कार्यकर्त्याचं बटण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लावून दिलंय. नागपुरातील (Nagpur) एका कार्यक्रमात हा किस्सा घडलाय. व्यासपीठावरच नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्याच्या जॅकेटचं बटण लावून दिलंय.
नागपुरात ऍग्रोव्हिजन (Agro-vision) कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचा समारोप आज झाला. त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हजेरी लावली होती. 24 तारखेला सुरु झालेलं हे कृषीप्रदर्शन आज गडकरींच्या मुख्य उपस्थित संपलं. यावेळी एक खास गोष्ट घडली. नितीन गडकरींनी चक्क व्यासपीठावरच आपल्या एका कार्यकर्त्याच्या जॅकेटचं बटण लावून दिलं.
त्याचं झालं असं, की नितीन गडकरींनी समारोपाचं भाषण केलं. हे भाषण संपल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रंगीत कापसापासून तयार केलेलं एक सुंदर जॅकेट समारोपाच्या कार्यक्रमात भेट देण्यात आलं.
मात्र नितीन गडकरी यांनी समारोप कार्यक्रमात भेट मिळालेलं हे जॅकेट आपल्याच भाजप किसान मोर्च्याचे सरचिटणीस आनंदराव राऊत यांना लगेचच भेट म्हणून देऊन टाकलं. त्यानंतर व्यासपीठावरच या कार्यकर्त्याला उपस्थितांनी ते जॅकेट घालायला लावलं. हे पाहून नितीन गडकरींनीही हसत-हसत आपल्या कार्यकर्त्याला भेट दिलेल्या जॅकेटची बटणं स्वतःच्या हातांनी लावून दिली. हे पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला. आपल्याला मिळालेली भेट कार्यकर्त्याला देऊन गडकरींनी कार्यकर्त्यासह उपस्थितांचीही मनं जिंकली.
प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आपला नेता हा देवासारखाच! हेच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या एका व्हिडीओमध्ये दिसल्याचं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं होतं. कार्यकर्त्याचा हात दुखत असल्यानं राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्याच्या हाताला मलम लावून दिलं होतं. राज ठाकरेंच्या व्हिडीओची चर्चाही तुफान झाली होती. त्यानंतर आता नितीन गडकरींनी आपल्या कार्यकर्त्याला जॅकेट भेट देऊन त्याची बटणं लावली आहे. याचीही नागपुरात चर्चा झाली नाही, तरच नवल!
Video : वरातीवेळीच नवरदेवाची पॅन्ट फाटली! लग्नात उपस्थित लोकही पोट धरुन हसले
अंत्यसंस्कारासाठी लोक निघाले, वृद्धाने अचानक श्वास घेतला, डोळेही उघडले!
विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका, नाना पटोलेंची टीका, राज्यपाल भाजपची बी टीम?