CM Devendra fadanvis press conference : मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे

| Updated on: Nov 08, 2019 | 5:25 PM

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षात सत्ता स्थापनेवरुन जोरादार सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे.

CM Devendra fadanvis press conference : मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Follow us on

मुंबई : निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षात सत्ता स्थापनेवरुन जोरादार सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून सतत मुख्यमंत्रिपदाची (CM devendra fadanvis press conference) मागणी भाजपकडे केली जात आहे. पण भाजप मुख्यमंत्रिपद शिवसेनेला सोडत नसल्यामुळे राज्यात सत्ता स्थापन होण्यास विलंब होत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पत्रकार परिषद (CM devendra fadanvis press conference) घेतली. या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

  • गेले पाच वर्ष मला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी महाराष्ट्रातील सर्व जनतेचे आभार मानतो.
  • महाराष्ट्रातील वेगवेगळी संकट दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला. त्यावेळी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला.
  • गेल्या पाच वर्षात आम्ही शहर आणि गाव अशा प्रत्येक ठिकाणी विलक्षण असा प्रकारचा विकास केला. राज्यात अजून खूप समस्या आहेत. समस्या पाच वर्षात संपतील असं नाही. पण गेल्या पाच वर्षात राज्यात मोठ काम झाले आहे.
  • लोकसभेत जनतेने आम्हाला बहुमत दिले. विधानसभेलाही जनेतेने आम्हाला साथ दिली. आमच्या महायुतीला संपूर्ण बहुमत दिले. 160 पेक्षा अधिक जागा आम्हाला मिळाल्या त्यामुळे भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. त्यामुळे मी महाराष्ट्रातील जनतेचे खूप आभार व्यक्त करतो.
  • उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी सरकार बनवण्यासाठी आमची दारं खुली आहेत, असं वक्तव्य केले. त्यामुळे आम्हाला धक्का बसला. कारण जनतेने आम्हाला महायुती म्हणून मतदान केले होते. त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य का केले हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला.
  • खरतर अडीच वर्षाचा जो काही विषय आहे. तो विषय कधीच आतापर्यंत माझ्यासमोर ठरला नव्हता. अडीच वर्षाच्या विषयावरही कधी निर्णय झाला नाही. उद्धव ठाकरे किंवा अमित शाह यांच्यामध्ये विषय झाला असेल पण त्याची कल्पना मला नाही.
  • सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने जी भूमिका मांडली ती खोटी आणि चुकीची नाही. यातून काही गैरसमज झाले असतील, तर त्यासाठी चर्चा करणे गरजेचे आहे. पण शिवसेना चर्चा करण्यास तयार नाही.
  • गेल्या पाच वर्षात मी अनेकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होते. मी स्वत: उद्धव ठाकरेंना फोन केला त्यांनी तो घेतला नाही. आम्ही चर्चा थांबवली नसून शिवसेनेकडून चर्चा थांबवली. चर्चेची दारे आमच्यासाठी खुली आहेत.
  • आमच्यासोबत चर्चा करायला शिवसेनेला वेळ नाही. पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा करायला वेळ आहे. रोज तीन वेळा त्यांना त्यांच्याशी चर्चा करायला वेळ आहे.
  • त्यांच्या आजूबाजूचे लोक आहेत. ते ज्या प्रकारची वक्तव्य करत आहेत. त्यामुळे सरकार होणार नाही. त्यामुळे फक्त माध्यमांमध्ये जागा मिळेल. असं कुणी समजू नये आम्हाला उत्तर देता येत नाही. आम्हालाही उत्तर त्या भाषेत देता येतात. पण आम्ही लोक तोडणारे नसून लोकांना जोडणारे आहोत.