Devendra Fadnavis : न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीच संबंध नाही, लवकरच मंत्र्यांचा शपथविधी; फडणवीसांचं स्पष्टीकरण

| Updated on: Jul 20, 2022 | 1:33 PM

Devendra Fadnavis : जैसे थे कशाबद्दल आहे. ते पक्क असावं. दोन्ही बाजूच्या गटांनी एकमेकांना नोटीसा दिल्या आहेत. अपात्रतेच्या कारणासाठीच्या या नोटिसा आहेत. त्यामुळे कुणीही एकमेकांना अपात्र करू नये यासाठी जैसे थे परिस्थिती ठेवली गेली आहे. बाकी गोष्टीवर नाही.

Devendra Fadnavis : न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीच संबंध नाही, लवकरच मंत्र्यांचा शपथविधी; फडणवीसांचं स्पष्टीकरण
न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीच संबंध नाही, लवकरच मंत्र्यांचा शपथविधी; फडणवीसांचं स्पष्टीकरण
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणावर येत्या 1 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोर्टाने जैसे थे परिस्थिती सांगितली आहे. त्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीच संबंध नाही. न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळ विस्तार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच कोर्टाचा निकाल यायचा होता म्हणून आमचा मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) थांबला नाही. पुढील काही दिवसात विस्तार निश्चित होईल, असा दावाही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ते मीडियाशी संवाद साधत होते. तसेच कोर्टाच्या इतर निरीक्षणावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

शिंदे गटाच्या वकिलाने आज चांगला युक्तिवाद केला. त्यावर आम्ही समाधानी आहोत. संविधान पीठाचा हा विषय आहे. त्यांच्याकडे हा विषय जाणं महत्त्वाचं आहे, असं आमच्या वकिलाने सांगितलं. कोर्ट त्यावर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी करणार आहे. आम्ही आजच्या युक्तिवादावर समाधानी आहोत. आमची केस मजबूत आहे. योग्य निर्णय आमच्या बाजूने येईल याचा आम्हाला विश्वास आहे, असं फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अपात्र ठरवू नये म्हणून जैसे थे परिस्थिती

जैसे थे कशाबद्दल आहे. ते पक्क असावं. दोन्ही बाजूच्या गटांनी एकमेकांना नोटीसा दिल्या आहेत. अपात्रतेच्या कारणासाठीच्या या नोटिसा आहेत. त्यामुळे कुणीही एकमेकांना अपात्र करू नये यासाठी जैसे थे परिस्थिती ठेवली गेली आहे. बाकी गोष्टीवर नाही. त्यामुळे चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असं फडणवीस म्हणाले.

भाष्य करणं योग्य नाही

कोर्टाच्या इतर निरीक्षणांवर मी बोलणार नाही. जरी सरन्यायाधीशांनी आमच्या बाजूने काही मते नोंदवली असली तरी मी त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. मी मेरिटवर बोलणं योग्य होणार नाही, असंही ते म्हणाले.

म्हणून विस्तार केला नव्हता

न्याायलयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा संबंध नाही. राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती. त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. लवकरच विस्तार होईल. तसेच पावसाळी अधिवेशनही लवकरच होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.