बीड : परळी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे काल (10 जानेवारी) परळीत दाखल (dhananjay munde felicitation at beed) झाले. धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत विजयी मिरवणूक आणि नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी सुरु झालेल्या ही मिरवणूक जवळपास चार तासांपेक्षा अधिक वेळ सुरु होती. या मिरवणुकीनंतर रात्री 11च्या सुमारास धनंजय मुंडे व्यासपीठावर येत सर्व परळीकरांचे आभार मानले.
“परळीच्या जनतेने मला अभूतपूर्व प्रेम दिलं आहे. त्या प्रेमाच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. त्यामुळेच कदाचित विधात्याने मला बोलण्याची संधी दिली नसावी. मी परळीकर जनतेचे उपकार कधीच विसरु शकत नाही.” अशी धनंजय मुंडे यावेळी (dhananjay munde felicitation at beed) म्हणाले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे हे त्यांचे वडील स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार कोण? या प्रश्नाचेही त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
“गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी राजकीय जीवनात वाटचाल करत आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासह बीड जिल्ह्याचा तसेच परळी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती मी पूर्णपणे पार पाडेन,” असे धनंजय मुंडे म्हणाले.
राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या भव्य नागरी सत्काराचे परळीमध्ये आयोजन करण्यात आले होते. या सत्कारासाठी अवघं परळी शहर नटून थटून सज्ज होतं. अनेक चौकाचौकात मोठे बॅनर आणि कमानी लावून मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. तब्बल तीन तासांपेक्षा जास्त वेळ परळी शहरातून धनंजय मुंडे यांची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण आणि मिठाईचे वाटप अशा स्वरूपात हा सगळा कार्यक्रम सुरु होता. संध्याकाळी सुरु झालेली ही मिरवणूक चार तासांपेक्षा अधिक काळ सुरू होती. रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास बंदी असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी भाषण केले नाही. मात्र रात्री 11 वाजता व्यासपीठावर येत त्यांनी शेकडो लोकांचे सत्कार स्वीकारत त्यांचे आभार (dhananjay munde felicitation at beed) मानले.
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत सोन्याची कमान
धनंजय मुंडेंचा सहावीपासून फॅन, लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी 174 किलोंचा हार