मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने टीकेचे धनी ठरलेल्या राज्यपाल (Governor) महोदयांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर ही कारवाई अटळ असल्याची अटकळ राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याविरोधात केंद्र सरकार (Central Government) मोठा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून कळते. राज्यपालांच्या विरोधात राज्यात वातावरण तापले आहे. भाजपचेच खासदार उदयनराजे (MP Udayanraje Bhosale) यांनी त्यांच्याविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. तर दुसरीकडे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. त्याचा फटका बसण्याची शक्यता लक्षात राज्यपाल हटाव मोहिमेला यश येण्याची चिन्हं आहेत.
राज्यपालांचे पार्सल परत पाठवा अशी मागणी राज्यात अनेकदा राजकीय पक्ष आणि सामाजिक संगघटनांनी केली होती. यापूर्वीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानामुळं राज्य सरकार अडचणीत आले आहे. आता त्यांच्याविरोधात जनभावना आहेत.
गुजरात निवडणुकीचा शेवटचा टप्पा 5 डिसेंबर रोजी मतदानानंतर संपेल. तर 19 डिसेंबरपासून नागपुरला विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांचा कडवा सामना करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 8 डिसेंबरनंतर राज्यपालाची उचलबांगडी करण्यात येईल असा चर्चा रंगली आहे.
दरम्यान राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राज्यपालांच्या वादग्रस्त विधाना बाबात राज्यातील जनतेची बाजू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला कळवल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपालांना हटविण्याचा निर्णय केंद्र घेत असते. केंद्र सरकार याविषयी योग्य तो निर्णय घेईलच. पण राज्यपालांनी वेळीच माफी मागितली असती तर हा विषय वाढला नसता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्यावेळी राज्यपालांच्या माफीनंतर वादग्रस्त प्रकरणावर पडदा पडल्याची आठवण केसरकरांनी करुन दिली.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात वादग्रस्त विधान करण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्यांच्या विधानानंतर उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, मराठा संघटना, शिवप्रेमींनी जोरदार आंदोलन केले होते.