अहमदनगर महापालिकेसाठी भाजपची तयारी, चंद्रकांत पाटलांसोबत नगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक

| Updated on: Aug 03, 2021 | 4:25 PM

अहमदनगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यात महत्वाची बैठक पार पडली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही बैठक घेण्यात आली.

अहमदनगर महापालिकेसाठी भाजपची तयारी, चंद्रकांत पाटलांसोबत नगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक
आमदार शिवाजी कर्डीले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे : अहमदनगर महापालिकेवर जूनमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांनी बिनविरोध निवड झालीय. भाजपकडे महापौरपदासाठी उमेदवारच नव्हता. तर उपमहापौर पदासाठी भाजपनं रस दाखवला नाही. या पार्श्वभूमीवर आज अहमदनगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यात महत्वाची बैठक पार पडली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही बैठक घेण्यात आली. (Meeting of MLA Shivaji Kardile and BJP party Workers in the presence of Chandrakant Patil)

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. नगर जिल्ह्यातील पक्षांतर्गत सर्व नाराजी, गटातटाचं राजकारण विसरुन आगामी महापालिका निवडणुकीला सामोरं जाण्यावर या बैठकीत चर्चा झाली. आमदार शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली भाजप अहमदनगर महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं आता तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे.

सुजय विखेंच्या वक्तव्यानं महापौर निवडीदरम्यान चर्चेला उधाण

अहमदनगरचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांना निरोप देताना अडीच वर्षात केलेल्या कामांचं भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रेझेंटेशन दिलं होतं. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता स्थापन झाली होती. मात्र पुन्हा योग जुळून आला तर पुढील काळात एकत्र येऊ. अहमदनगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन आघाडी करायला तयार आहोत, असं स्पष्ट मत सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं होतं. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर होणार का, अशाही चर्चा रंगली होती. त्यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तसेच भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना- 23
राष्ट्रवादी-18
भाजप-15
काँग्रेस-5
बसपा-4
सपा-1
अपक्ष-2

एकूण – 68

संबंधित बातम्या :

पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच, पुण्याच्या निर्बंधांवरुन महापौरांचा हल्लाबोल

राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Meeting of MLA Shivaji Kardile and BJP party Workers in the presence of Chandrakant Patil