कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत एसओपी लागू करणार, अजित पवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा

| Updated on: Mar 04, 2021 | 8:03 PM

राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी 31 मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. | Ajit pawar

कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत एसओपी लागू करणार, अजित पवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा
Ajit Pawar
Follow us on

मुंबई : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी 31 मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. (Ajit Pawar Announcement Thackeray Government Will make SOP Covid Center Women Security over Aurangabad Case)

औरंगाबाद शहरातल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी घटनेची गंभीर दखल घेत कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत एसओपी लागू करणार असल्याची घोषणा केली.

औरंगाबादची घटना दुर्दैवी असून सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे, असं अजित पवार यांनी सांगितलीय.

औरंगाबादच्या घटनेचे विधानसभेत पडसाद

कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली

नेमकी घटना काय?

औरंगाबाद शहरातील पदमपुरा भागात असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये एका डॉक्टरनेच महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी राऊंडवर असताना डॉक्टरने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेनं गोंधळ करताच डॉक्टर त्या ठिकाणाहून फरार झाला. ही घटना समोर आल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती.

डॉक्टर बडतर्फ

या प्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे.

(Ajit Pawar Announcement Thackeray Government Will make SOP Covid Center Women Security over Aurangabad Case)

हे ही वाचा :

‘मास्क लावून काळजी घ्या’, राज ठाकरेंचं नाव घेता अजित पवारांचा टोला