मुंबई : महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण? असा प्रश्न विचारला जात होता. अशावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आता विरोधी पक्षनेते असणार आहेत. तशी घोषणा सभापतींनी केलीय. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला विरोधी पक्षनेतेपद (Opposition Leader) दिलं जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अखेर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
NCP’s Ajit Pawar is new Leader of Opposition in Maharashtra Assembly
— Press Trust of India (@PTI_News) July 4, 2022
राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर आता विरोधी पक्षनेता कोण होणार? राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याकडील एखाद्या आमदाराला विरोधी पक्षनेते पद देणार का? असा सवालही विचारला जात होता. मात्र, आज अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांचंही नाव चांगलंच चर्चेत होतं. मात्र, अखेर अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीय.
राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर आता विरोधी पक्षनेता कोण होणार? राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याकडील एखाद्या आमदाराला विरोधी पक्षनेते पद देणार का? असा सवालही विचारला जात होता. मात्र, आज अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांचंही नाव चांगलंच चर्चेत होतं. मात्र, अखेर अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीय.
अजित पवार यांनी सत्तेत असताना उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, अर्थमंत्री अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत. अजित पवार यांनी ही खाती केवळ सांभाळली नाही तर त्या खात्याचा मंत्री म्हणून आपल्या काळात वेगळी छापही पाडली आहे. अशा अजित पवार यांची आज विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यापूर्वी विरोधी बाकांवर बसली, मात्र विरोधी पक्षनेते पद अजित पवार यांनी कधी भूषवलं नव्हतं.
Speaking on the motion to congratulate Leader of Opposition Shri Ajit dada Pawar in Maharashtra Assembly.#Maharashtra #AssemblySession@AjitPawarSpeaks https://t.co/qcbTvLSmN8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2022
‘अजित पवारांची प्रेमाची दादागिरी चालते. अजित पवारांनी दिलेला शब्द हा मोडला जात नाही. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे स्थिर आहेत. मात्र अजित पवार हे वक्तशीर आहेत. मागच्या काळात मंत्रालय बंद राहिलं असतं. मात्र अजित पवारांमुळे उघडायला लागायचं. काम होणार असेल, नसेल तर ते तोंडावर सांगतात. त्यांना सर्व प्रकारची चांगली माहिती त्यांच्याकडे आहे. त्यांचा आणि माझा जन्मदिवस एकच आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते एकदा अडचणीत आले. मात्र आत्ता ते विचार करून बोलतात’, अशा शब्दात फडणवीस यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि त्यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी शुभेच्छाही दिल्या.