अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला 11 खाते मिळणार?, कोणती कोणती खाती मिळणार?; संभाव्य यादी पाहा

| Updated on: Jul 03, 2023 | 12:18 PM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह त्यांच्या एकूण 9 सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्र्यांना संध्याकाळपर्यंत खाती दिली जाणार आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला 11 खाते मिळणार?, कोणती कोणती खाती मिळणार?; संभाव्य यादी पाहा
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह त्यांच्या एकूण 9 सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्र्यांना संध्याकाळपर्यंत खाती दिली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची यादी समोर आली आहे. अजित पवार यांच्या गटाला 11 खाते दिली जाणार आहेत. यातील काही महत्त्वाची खाती अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अजित पवार यांनी काल राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, आमदारांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे कोणतं पद जाणार? अजित पवार यांना कोणतं खातं मिळणार? अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना भाजपकडील खाते मिळणार की शिंदे गटाच्या खात्यांनाही कात्री बसणार? अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता अजित पवार यांच्या गटाला कोणती खाती मिळणार याची एक संभाव्य यादी समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

अजितदादांकडे अर्थ किंवा महसूल?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खाती वाटपाची चर्चा सुरू आहे. चांगली आणि अधिकाधिक खाती आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या खात्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या गटाला अर्थ किंवा महसूल, महिला आणि बाल विकास, क्रीडा आणि युवक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय, मासेमारी वस्त्र मंत्रालय, मागास आणि बहुजन कल्याण, वाहतूक, गृहनिर्माण, अल्पसंख्याक, वक्फ, सामाजिक न्याय आपत्ती व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन ही 11 खाती देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या खाते वाटपाची माहिती आज संध्याकाळपर्यंत येईल आणि उद्या सर्वच नऊ मंत्री पदभार स्वीकारतील, असं सूत्रांनी सांगितलं.

अजित पवार गटाकडे जाणारी मंत्रीपदे

अर्थ किंवा महसूल

महिला आणि बाल विकास

क्रीडा आणि युवक कल्याण

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय

मासेमारी, वस्त्र मंत्रालय

मागास आणि बहुजन कल्याण

वाहतूक

गृहनिर्माण

अल्पसंख्याक आणि वक्फ

सामाजिक न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन

पशुसंवर्धन

धनंजय मुंडे यांच्याकडे समाजकल्याण?

दरम्यान, या खातेवाटपात धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन तसेच हसन मुश्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक आणि वक्फ मंत्रालय जाण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास कातं जाऊ शकतं. तर छगन भुजबळ यांच्याकडे पूर्वीचंच अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रालय जाण्याची शक्यता आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महत्त्वाचं खातं दिलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या खात्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.