Ajit Pawar : अजित पवार पुन्हा नाराज..! चर्चेनंतर काय दिले स्पष्टीकरण?

| Updated on: Sep 11, 2022 | 5:21 PM

अजित पवार यांचा स्वभाव तडकाफड आहे. याचा अनुभव पक्षातील आणि प्रशासनातील व्यक्तिंनाही आहे. असे असतानाच राष्ट्रीय अधिवेशनातून एकदा नव्हे तर दोन वेळा सभागृह सोडून थेट निघून गेले. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती.

Ajit Pawar : अजित पवार पुन्हा नाराज..! चर्चेनंतर काय दिले स्पष्टीकरण?
अजित पवार
Follow us on

दिल्ली :  (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) अजित पवार हे पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार नाराज म्हणल्यावर काहीतरी पक्षातच बिनसले असेल असा कयास केला जाऊ शकतो. कारण त्याला तशी पार्श्वभूमीही आहे. आता राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे (National Convention)  राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान अजित पवार हे दोनवेळा व्यासपीठ सोडून निघून गेले होते. त्यांच्या या तडकाफडकी स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर नाराज आहेत का ? अशी चर्चा सुरु आहे. अधिवेशनादरम्यान त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले नसल्याने ही चर्चा सुरु झाली आहे. याबाबत त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरणही दिले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

दिल्ली येथे आयोजित असलेले अधिवेशन हे काही राज्याचे नाही तर राष्ट्रीय अधिवेशन होते. या व्यासपीठावर देशभरातून विविध मान्यवर आले होते. त्यांच्यासमोर बोलणे उचित राहणार नाही त्यामुळे बोललो नसल्याचे अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितले आहे.

दोनवेळा सोडले सभागृह

अजित पवार यांचा स्वभाव तडकाफड आहे. याचा अनुभव पक्षातील आणि प्रशासनातील व्यक्तींना आहे. असे असतानाच राष्ट्रीय अधिवेशनातून एकदा नव्हे तर दोन वेळा सभागृह सोडून थेट निघून गेले. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती.