नागपूर : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटाचा दिवस आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविधल मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी येत्या 2024 च्या निवडणुकीत पवार कुटुंबाचा बारामतीत करेक्ट कार्यक्रम करू असं म्हटलं होतं. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं. “बावनकुळे यांनी आमचा करेक्ट कार्यक्रम करू, असं सांगितलं तेव्हापासून मला झोप येत नाहीये. मला तर वाटतंय राजकारणातून संन्यास घेतलेला बरा!”, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत.
आम्ही तीन आठवडे अधिवेशन घ्या, अशी मागणी केली होती. सर्वांची उपस्थिती व्यवस्थित आहे. तिसरा आठवडा अधिवेशन घेऊ असं सांगितलं. परंतू आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आणखी एक आठवडा पाहिजे होता, असं अजित पवार म्हणालेत.
महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चा काढला होता. महापुरुषांबद्दल महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य केली जात आहेत. हा विषय आम्ही अंतिम आठवडा प्रस्तावात घेतला आहे. ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गाला सर्वांनी मदत केली आणि मर्यादित काळात झाला. त्याप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग व्हावा, तो राष्ट्रीय महामार्गाची संबंधित आहे. पण सरकारने या संदर्भात भूमिका घ्यावी, असं अजित पवार म्हणालेत.
भ्रष्टाचाराचा मुद्दा देखील आम्ही उचलणार आहोत. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा देखील आम्ही मांडणार आहोत. काल कर्नाटकच्या एका मंत्र्यांनी मुंबई बद्दल वक्तव्य केलं त्याबद्दल हे प्रश्न उपस्थित करू. आज आम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव मांडव आणि चर्चा करू कदाचित उद्या देखील यावर चर्चा होईल, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
विधानसभेत हे विधेयक मंजूर झाला आता विधान परिषदेत मंजूर झाल्यानंतर कायद्यात रूपांतर होईल.सगळ्या बाजूने मजबूत अस विधेयक असायला हवं. पण त्या मला म्हणण्याची संधी मिळाली नाही आणि विधानसभेत विधेयक पास झाला. आम्ही विधान परिषदेमध्ये आमच्या लोकांना सांगू की त्यांनी अभ्यास करावा आणि त्यावर मत मांडावीत, असंही त्यांनी म्हटलं.