मुंबई : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या भेटीनंतर तर या चर्चांना हवा मिळाली. पण जर वंचित मविआमध्ये सामील होणार असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची भूमिका काय असेल, याबाबत तर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे.
महाविकास आघाडी समविचारी पक्षांना सोबत घेण्यास तयार आहे. काल अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांना विचारलं सर्वांची सकारात्मक भूमिका आहे. समविचारी पक्षांनी एकत्र लढलं पाहिजे. वंचित मविआसोबत येत असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं अजित पवार म्हणालेत.
महापरिनिर्वाण दिन भारताला वर्षानुवर्षे माहिती आहे. त्यांनी आधीच दुसरी तारिख का ठरवली नाही. आता पण त्यांनी दुसरा तारिख जाहीर करावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री आम्ही येऊन देणार नाहीत असे सांगतात, हे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी असं वक्तव्य करत आहेत, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात तक्रार काय करताय, आरेला कारेने उत्तर द्या. महाराष्ट्राची ताठर भूमिका मांडा.कर्नाटकचे मुख्यमंत्री जसे वक्तव्य करत आहेत, त्याच भाषेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं, असं म्हणत अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य केलंय.
भाजपने 543 मतदारसंघ टार्गेट करावेत. आम्हीही टार्गेट करू मतदारांच्या मनात काय? यातून पुढील गोष्टी ठरतात. त्यांनी त्यांच्या परीने विचार करावा.जनता ज्यांना निवडून द्यायचे त्यांनाच निवडून देईल, असं म्हणत अजित पवार लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलंय.