अजित पवार की दिलीप वळसे पाटील, पुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी?

| Updated on: Dec 05, 2019 | 7:49 PM

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पुण्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांकडे जाण्याची चर्चा सुरु झाली (Pune Guardian Minister) आहे.

अजित पवार की दिलीप वळसे पाटील, पुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी?
Follow us on

पुणे : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पुण्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांकडे जाण्याची चर्चा सुरु झाली (Pune Guardian Minister) आहे. अजित पवार पुण्याचे कारभारी झाल्यावर पुन्हा एकदा पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत (Pune Guardian Minister) आहे. पण पालिकेतील सत्ताधारी भाजपतर्फे मात्र अजित पवार पालकमंत्री झाले तरीही दोन्ही पालिकेत आमचीच सत्ता असेल असा दावा केला जात आहे. दरम्यान अजित पवारांसोबत या शर्यतीत दिलीप वळसे पाटील यांच्याही नावाची चर्चा असल्याचे बोललं जात (Pune Guardian Minister) आहे.

पुण्याच्या कारभाऱ्यावरून राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते. गेल्या पाच वर्षात गिरीश बापट यांच्याकडे पुण्याचा कारभार होता. तर त्यापूर्वी अजित पवार यांनी पुण्याचा कारभार पाहिला आहे. मात्र बापट केंद्रात गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद जाईल अशी शक्यता होती. मात्र सत्ता गेल्यामुळे पाटलांची ही संधी हुकली.

यामुळे अजित पवार यांची पुन्हा एकदा पालकमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील, संग्राम थोपटे आणि दत्ता भरणे यांचेही नाव पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे बोललं जात आहे.

भाजपच्या कारभाराबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळे अजित पवार पालकमंत्री झाल्यावर याचा फायदा येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये होईल असा विश्वास राष्ट्रवादीकडून व्यक्त केला जात (Pune Guardian Minister) आहे.

राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार असं वातावरण विधानसभा निवडणुकीपूर्वी होते. मत चाचण्यांमध्ये देखील भाजप बहुमताच्या जवळ दाखवण्यात आले होते. त्यानुसार भाजपमधील अनेक नेत्यांचे पालकमंत्रिपद निश्चित मानले जाऊ लागले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होणार हे जवळजवळ निश्चित होते. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यामुळे त्यांची ही संधी हुकली. अस असलं तरी पालिकेत आमच्या सत्तेला कोणी हलवू शकत नाही, असं मत भाजपचे नेते गणेश बिडकर यांनी व्यक्त केलं आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र, गेल्या पंचवार्षिकला या दोन्ही महापालिकेत भाजपने एक हाती सत्ता मिळवत, राष्ट्रवादीला सुरुंग लावला. अजित पवार पालकमंत्री झाल्यास त्यांची प्रशासनावरच्या कामाची पकड पाहता येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा नक्कीच फायदा होईल असे मतं राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी व्यक्त केला (Pune Guardian Minister) आहे.

या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. पालकमंत्रिपदासाठी अनेक चेहरे शर्यतीत आहेत. यामध्ये दिलीप वळसे पाटील, संग्राम थोपटे आणि दत्ता भरणे यांच्या नावाची चर्चा आहे. पुणे शहरात भाजपचे सहा तर राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. पुणे महापालिकेतील आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली आहे. त्यामुळे पुण्यात पालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी अजित पवार यांच्या नावाला पसंती मिळू शकते.