मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान नाकारता येणार नाही (Ajit Pawar On Savarkar), मात्र त्यांच्याबाबत पुन्हा पुन्हा चर्चा करुन, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करुन समाजात गैरसमज पसरवण्याचं कारण नाही’, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडसावलं. शिवसेना सत्तेच्या लोभापायी सावरकरांचा अपमान सहन करत आहे, अशी टीका मंगळवारी (25 फेब्रुवारी) आझाद मैदानावरच्या भाषणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर आज सावरकरांच्या पुण्यतिथीला उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार केला.
“स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान काही गोष्टींमध्ये मोठं आहे, हे नाकारता येत (Ajit Pawar On Savarkar) नाही. आता जी व्यक्ती हयात नाही, तिच्याबद्दल पुन्हा पुन्हा चर्चा करुन काही जण समाजात एक वेगळ्या प्रकारचा गैरसमज निर्माण करत आहेत. माझी त्या सर्वांना विनंती आहे, त्या सर्व व्यक्ती ज्यांचा आज देशाच्या आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत उभारणीमध्ये किंवा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे, त्यांचा आदर केला पाहिजे. ज्या व्यक्ती आज जाऊन अनेक वर्ष झाली आहेत, त्यांच्या संदर्भात पुन्हा काही प्रश्न उपस्थित करुन समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचं काहीही कारण नाही”, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीका केली.
तसेच, “विरोधकांनी गदारोळ केला, तरी काम होणारच विरोधकांनी काय करावं, हा त्यांचा अधिकार आहे”, अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी घेतली.
दरम्यान, आज स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आदरांजली वाहिली. भाजप नेते आशिष शेलार यांच्या विनंतीनंतर विधीमंडळात ठेवलेल्या सावरकरांच्या प्रतिमेवर थोरातांनी पुष्पांजली वाहिली.
हेही वाचा : आशिष शेलारांची विनंती, बाळासाहेब थोरातांचं सावरकरांना अभिवादन
भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव-सन्मानदर्शक ठराव विधिमंडळात
भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव-सन्मानदर्शक ठराव विधिमंडळात मांडल्यावर काय भूमिका घ्यायची, यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेतली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव आणून शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडीतील दरी वाढवण्याबाबत भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्वातंत्र्यावीर सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडे भाजपने दिलेला प्रस्ताव नाकारला गेला असला (Ajit Pawar On Savarkar), तरी भाजप ठराव मांडण्यावर ठाम आहे.
संबंधित बातम्या :
सहसा मी प्रत्युत्तर देत नाही, पण.., बांगड्यांबाबतच्या विधानावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर!
आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या प्रस्तावालाही स्थगिती : सुधीर मुनगंटीवार
वो मशहूर हुए, जो काबिल न थे! बांधावरच्या घोषणेचं काय झालं? सांगा उद्धवजी सांगा! : देवेंद्र फडणवीस