Ajit Pawar Update LIVE : माझ्या सदसदविवेकाला जागून राजीनामा : अजित पवार

| Updated on: Sep 28, 2019 | 4:23 PM

अजित पवारांच्या (Ajit Pawar resigns) राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar Update LIVE : माझ्या सदसदविवेकाला जागून राजीनामा : अजित पवार
Follow us on

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resigns) यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर ते नेमके कुठे आहेत याची शोधाशोध सुरु होती. मात्र आज  दुपारी 1 च्या सुमारास अजित पवार (Ajit Pawar resigns) शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी खुद्द शरद पवार हे पुण्यावरुन मुंबईतील घरी सिल्व्हर ओकला पोहोचले. अजित पवारांपाठोपाठ त्यांचे सख्खे लहान भाऊन श्रीनिवास पवारही सिल्व्हर ओकला आले. पवार कुटुंबातील शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार यांनी  कौटुंबीक बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे अन्य नेते शरद पवारांच्या घरातील बाहेरच्या खोलीत होते.

अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर अजित पवार यांचा मोबाईलही बंद (Ajit pawar Missing) होता. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या निवासस्थानासह फार्म हाऊसवर शुकशुकाट (Ajit pawar Missing) पाहायला मिळाला.  दरम्यान अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अनभिज्ञ आहेतच, पण त्यांच्या कुटुंबीयांनाही राजीनाम्याची माहिती नाही.

LIVE UPDATE

माझ्या सदसदविवेकाला जागून राजीनामा दिला. या निर्णयाने पक्षातील अनेकांना दुःख झालं. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा झाला तेव्हाही असंच झालं होतं. मी जर कुणालाही सांगितलं असतं तर त्यांनी मला निर्णय घेऊ दिला नसतो. त्यांना दुखावलं म्हणून मी त्यांची माफी मागतो. – अजित पवार

[svt-event title=”राष्ट्रवादीचे दिग्गज नेते वाय बी चव्हाण सेंटरमध्ये” date=”28/09/2019,3:16PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे दिग्गज नेते वाय बी चव्हाण सेंटरमध्ये , छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील उपस्थित, थोड्याच वेळात अजित पवारांची पत्रकार परिषद [/svt-event]

[svt-event title=”माझ्या चेहऱ्यावरून तर तुम्हाला सर्व दिसून येते, चिंता नाही – शरद पवार” date=”28/09/2019,2:26PM” class=”svt-cd-green” ] कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही माझ्या चेहऱ्यावरून तर तुम्हाला सर्व दिसून येते. आम्ही कुटुंबीयांसोबत चर्चा केली आहे. धनंजय मुंडे, अजित पवार या संदर्भामध्ये तीन वाजता माध्यमांना माहिती देतील. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत माहिती मिळेल, असं शरद पवार म्हणाले. [/svt-event]

[svt-event title=”घरात कुठलाही वाद नाही – शरद पवार” date=”28/09/2019,2:21PM” class=”svt-cd-green” ] घरात कुठलाही वाद नाही, राजकीय नव्हे तर कौटुंबीक चर्चा होती, अजित पवार पुढील भूमिका पत्रकार परिषदेत मांडतील, धनंजय मुंडेंच्या घरी पत्रकार परिषद होईल, अजित पवार जास्त स्पष्ट बोलतील – शरद पवार लाईव्ह [/svt-event]

[svt-event title=”आघाडीच्या नेत्यांची बैठक” date=”28/09/2019,1:28PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस- राष्ट्रवादीची विधानसभा जागावाटपाबाबत आज बैठक, ६-७ विधानसभा जागावरून आघाडीत मतभेद, मेळघाट, नागपूर शहर, गडचिरोली, अहेरी, अकोला, अमरावती यासह काही जागांचा तिढा सोडवणार, बाळसाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील बैठकीला उपस्थित राहणार [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरेंचं पवारांवर टीकास्त्र” date=”28/09/2019,1:19PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अजित पवारांचा सख्खा भाऊ पवारांच्या भेटीला” date=”28/09/2019,12:41PM” class=”svt-cd-green” ] अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार हे शरद पवार यांच्या भेटीला, अजित पवार यांच्या राजीनाम्याचे गूढ वाढले. अजित पवार यांचे मोठे बंधू उद्योजक असलेले श्रीनिवास पवार हे शरद पवार यांचे निवासस्थानी दाखल झाले आहेत #Ajitpawar [/svt-event]

[svt-event title=”अजितदादांच्या नेतृत्त्वात लढू – तटकरे” date=”28/09/2019,12:10PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शरद पवार मुंबईतील निवासस्थानी दाखल” date=”28/09/2019,12:02PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अजित पवारांचा फोन सुरु” date=”28/09/2019,11:43AM” class=”svt-cd-green” ] अजित पवारांचा फोन सुरु, शरद पवारांशी चर्चा, थोड्याच वेळात शरद पवार मुंबईच्या निवासस्थानी पोहोचणार [/svt-event]

[svt-event title=”अजित पवारांची पत्रकार परिषद नाही” date=”28/09/2019,11:42AM” class=”svt-cd-green” ] अजित पवारांची पत्रकार परिषद नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची टीव्ही 9 मराठीला माहिती, अजित पवार आणि शरद पवार यांचं फोनवरुन बोलणं झालं [/svt-event]

[svt-event title=”पिंपरीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा राजीनामा” date=”28/09/2019,10:30AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचा राष्ट्रवादीला रामराम. आताची राजकरणातील परिस्थिती खालवली असल्याचे कारण देत राजीनामा. शहर अध्यक्ष संजोग वाघिरे यांच्याकडे राजीनामा पाठवला [/svt-event]

[svt-event title=”अजित पवारांची पत्रकार परिषद?” date=”28/09/2019,10:28AM” class=”svt-cd-green” ] अजित पवार आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता [/svt-event]

दरम्यान अजित पवार नगरमधील कर्जत तालुक्यातील त्यांच्या अंबालीका साखर कारखान्यावर (Ajit pawar at ambalika sugar factory)  असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ते नेमके तेथे कोणत्या कारणासाठी गेले याबाबत अद्याप माहिती (Ajit pawar Missing) मिळू शकली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (29 सप्टेंबर) रात्री उशिराने अजित पवार नगरमधील अंबालिका कारखान्यावर दाखल झाले. त्यांच्या कारखान्यावरील मुक्कामाबाबत कमालीची गुप्तता पाळली (Ajit pawar at ambalika sugar factory) जात आहे. अजित पवार यांच्यासोबत कारखान्यात वीरधवल जगदाळे असल्याची माहिती मिळत आहे. जगदाळे हे पवार यांचे भागीदार आहेत.

अजित पवारांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar resigns ) यांनी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा (Ajit Pawar resigns ) राजीनामा मंजूर केला. अजित पवारांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

संबंधित बातम्या 

राजीनाम्यानंतर अजित पवार गायब? नगरमधील कारखान्यात असल्याची माहिती