मुंबई : आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदे घेत पुन्हा सरकारला धारेवर धरला आहे. राज्यात झालेली अतिवृष्टी (Heavy Rain) आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Expansion) त्यांनी सरकारला अनेक सवाल केलेले आहेत. तसेच तात्काळ अधिवेशन घ्या अशीही मागणी अजित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत लावून धरली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो बाबत एक वायरल होणारी बातमी त्यावरही अजित पवारांनी सविस्तर भाष्य केलं. आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टता आणवी, तसेच तिथल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे? असा सवाल प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. हा आध्र प्रदेशातील प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आणखी एक बातमी सातत्याने येत आहे. तिरुपती देवस्थानच्या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या वाहनांना तिथे प्रवेश नाकारला असे दाखवण्यात येत आहे. मागेही असाच प्रकार निदर्शनास आला होता, त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांच्याशी मी मागेही बोललो आहे, ते त्या ठिकाणचे ट्रस्टी आहेत. ते त्या संबंधित बोलतील. कारण गैरसमज पसरत आहेत, ते दैवत आहे. दैवताबद्दल वेगळ्या बातम्या येणे हे देखील चुकीचं आहे. त्याबद्दल तुम्ही आज स्टेटमेंट करा असं मी त्यांना सांगितलं आहे, असेही अजित पवार म्हणाले.
तर त्यांनी कुठली अडचण नसल्याचे सांगितलं आहे, मात्र मी त्यांना सांगितलं भाविकांच्या भावना भडकवल्या जात आहेत. आम्हाला अनेक लोक फोन करून विचारत आहेत, आपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून असं तिथं काही घडलं आहे का? आणि त्याबाबत त्या सरकारची भूमिका काय? हे बघितलं पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
सोशल मीडियावर असे मेसेज अनेकता वायरल होत असतात. त्याचा गैरफायदा घेऊन अनेक समाजकंटक समाजात विपरीत प्रकार घडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा वायरल मेसेज ना वेळीच आळा घालून सत्यता पडताळल्याशिवाय असे मेसेज पसरवू नये असे आव्हान ही सरकारकडून अनेकदा करण्यात येते आणि अशा परिस्थितीतही त्याच आदेशांचा पालन झालं पाहिजे.