Ajit Pawar : शिवसेनेचं निवडणूक चिन्ह मिळावं म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली?; अजितदादा नेमके काय म्हणाले?

| Updated on: Jul 16, 2022 | 2:09 PM

Ajit Pawar : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांच्याकडे मसल पावर आहे किंवा मनी पॉवर आहे तेच अशा प्रकारच्या निवडणूक लढवू शकतात. दोघांचे मंत्रिमंडळ असल्याने त्यांना हा निर्णय घेण्याची घाई झाल्याचे दिसत आहे, असा टोला अजितदादांनी लगावला.

Ajit Pawar : शिवसेनेचं निवडणूक चिन्ह मिळावं म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली?; अजितदादा नेमके काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असणारी वाहनं अडवली? तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांबाबत व्हायरल होणाऱ्या मसेजवर अजित पवार म्हणतात...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बारामती: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील शिंदे सरकारवर (shinde government) जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचं (shivsena) धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मिळावं म्हणूनच राज्यातील होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत का? असा सवाल करण्यात आला असता अशा आरोपात तथ्य नसतं. म्हणून या आरोपांना उत्तर द्यायला मी रिकामा नाही. वस्तुस्थिती समोर आल्यावर त्यावर बोलेल, असं अजित पवार म्हणाले. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली आहे. मध्यावधी निवडणुका होतील असं वाटत नाही, असं ते म्हणाले. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाची संधी दिली. त्याबद्दल दुमत असण्याचे येण्याचं कारण नाही. पण त्याचा बोजा हा बाजार समितीवर पडणार आहे. नगराध्यक्ष थेट करता, सरपंच थेट करता, मग मुख्यमंत्री पण थेट करा, पंचायत समितीचा सभापती पण थेट करा. राष्ट्रपती देखील थेट करा. लोकशाहीत काही परंपरा घालून दिल्या आहेत. त्याच पालन करावं लागतं. सरपंच आणि नगराध्यक्ष एका विचाराचे असतात आणि कार्यकारिणी दुसऱ्या विचारांची असते. त्यामुळे कार्यकारिणीला विचारून निर्णय घेता येत नाही. मग सत्ता एक हाती जाते आणि हे लोकशाहीला घातक असते, असं अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार यांनी आज बारामतीत जनता दरबार भरवला होता. यावेली ते मीडियाशी बोलत होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांच्याकडे मसल पावर आहे किंवा मनी पॉवर आहे तेच अशा प्रकारच्या निवडणूक लढवू शकतात. दोघांचे मंत्रिमंडळ असल्याने त्यांना हा निर्णय घेण्याची घाई झाल्याचे दिसत आहे, असा टोला अजितदादांनी लगावला. पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा चर्चेला घ्यायला पाहिजे हा होता. त्यावर काही सूचना आल्या असत्या. त्यावर चर्चा झाली असते ते जास्त योग्य ठरले असते, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राज्यात पूरपरिस्थिती, पालकमंत्री नेमा

यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर टीका केली. विश्वास दर्शक ठराव पास केला. अध्यक्ष नेमला. मग मंत्रिमंडळ विस्तार का केला नाही? हे कळत नाही. पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी पालकमंत्री नेमणे गरजेचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशी मी जनतेच्यावतीने विनंती करतो, असं आवाहन त्यांनी केलं. अतिवृष्टीमुळे लोकांना त्रास करावा लागतो तो दूर करावा. अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे उपलब्ध करून द्यावी लागतील. ज्यांची घर पडली आहेत त्यांना मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

निर्णयाची अंमलबजावणी करू

शिवसेना-राष्ट्रवादीची युती व्हावी असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत उद्धव ठाकरे आणि पवार साहेब जो निर्णय घेतील त्यावर अंमलबजावणी करण्याचे काम आम्ही करू, असं ते म्हणाले.