बारामतीत जय पवार आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर, एकमेकांना मतदानाचं आवाहन

| Updated on: Oct 12, 2019 | 8:48 PM

बारामतीत जय पवार हे कार्यकर्त्यांसोबत प्रचार करत असताना त्यांना भाजप कार्यकर्ते (Jai Pawar Baramati Campaigning) भेटले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने एकमेकांना उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

बारामतीत जय पवार आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर, एकमेकांना मतदानाचं आवाहन
Follow us on

बारामती : राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपकडून विधानसभेसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे धाकटे पुत्र जय पवार सांभाळत (Jai Pawar Baramati Campaigning)आहेत. बारामतीत जय पवार हे कार्यकर्त्यांसोबत प्रचार करत असताना त्यांना भाजप कार्यकर्ते (Jai Pawar Baramati Campaigning) भेटले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने एकमेकांना उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यामुळे बारामतीत राजकारण हे केवळ निवडणुकीपुरती असल्याची प्रचिती अनेकांना (Jai Pawar Baramati Campaigning) अनुभवायला मिळाली.

बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात भाजपनं गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. बारामतीसाठी नवख्या असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तर अजित पवार यांनी 4 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून राज्यभरात दौऱ्याला सुरुवात केली.

त्यामुळे बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, भावजय शर्मिला पवार आणि पुत्र जय पवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. तर पार्थ पवार यांच्या हाताला इजा झाल्यानं ते सध्या पुणे परिसरातच प्रचार करत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडूनही अजित पवार यांच्या प्रचारार्थ पदयात्रा, कोपरा सभा, घोंगडी बैठका घेतल्या जात आहेत.

राष्ट्रवादीच्या प्रचारात जय पवार यांनी बारामती शहरात विविध भागात पदयात्रा करत आहे. अशाच एका पदयात्रेदरम्यान शहरातील भाजप कार्यालय फिरत असताना जय पवार आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. त्यांनी आपल्या उमेदवारीचे पत्रक एकमेकांना देत मतदान करण्याचे आवाहन केलं. विशेष म्हणजे याचे फोटो सेशनही करण्यात आले. यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत पुढचा प्रचारदौरा केला.

बारामतीत गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ पवार कुटुंबीयांची एकहाती सत्ता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी नेहमीच सूडाच्या राजकारणाला फाटा देत सर्वाना सोबत घेऊन काम केलं आहे.

त्यांचाच वारसा पुढे चालवत जय पवार यांनी समोर आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना अभिवादन केले. तसेच मतदानाचं आवाहन करत एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे आज या अनोख्या भेटीची चांगलीच चर्चा बारामतीत रंगल्याचं पाहायला मिळालं.