मुंबई, विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या विचारधारेबद्दल भुमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी पक्ष हा सुरवातीपासूनच सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रपुरूषांच्या विचाराला धरून चालणारा पक्ष आहे. जिवात जिव असे पर्यंत महापुरूषांच्या संस्काराला आणि विचाराला तडा जाऊ देणार नाही असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. लोकशाहीत प्रत्येकाला स्वताःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, मी कुठल्याही महापुरूषांचा अपमाण केलेला नाही असे देखील त्यांनी ठणकावून सांगीतले. छत्रपती संभाजी महाराज (Chatrrapati Sambhaji Maharaj) हे धर्मविर नव्हते तर ते फक्त स्वराज्य रक्षक होते अशी भुमीका अजित पवार यांनी सभागृहात मांडली होती. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून टिकेची झोड उठली आहे.
भारतीय नागरिक म्हणून कायदा आणि संविधानाचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे मात्र असे करत असताना प्रत्येकाला आपआपली भुमीका मांडण्याचा अधिकार आहे. माझी भुमीका प्रत्येकाला पटलीच पाहिजे हे आवश्यक नाही असे अजित पवार म्हणाले. मी महापुरूषांबद्दल कुठलेही अपशब्द वापरलेले नाही, मात्र सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि राज्यपालांच्या वक्तव्यांबद्दल कोणीच बोलायला तयार नाही असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. जाणिवपुर्वक वाताववरण गढूळ करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
स्वराज्यरक्षकामध्ये स्वराज्य, धर्म, संयम, अठरा पगड जाती, बारा बलुतेदार या गोष्टीदेखील येतातच असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.
निवडणूकीचे मुद्दे आताच सांगता येणार नाही, कोणताही राजकीय पक्ष इतक्या लवकर आपले मुद्दे उघड करत नाही. निवडणूका आल्यावर बैठका होतील त्यात भुमीकी ठरविली जाईल असे अजित पवार म्हणाले.