पुणे : “बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्तानं मुंबईत (Ajit Pawar on government bungalow) येतात. त्यावेळी मी नाराज होतो. मुंबईतलं घर लहान आहे. सरकार स्थापनेला जवळपास 100 दिवस पूर्ण होत आले तरी अद्याप शासकीय बंगला रिकामा झालेला नाही”, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. आज (14 फेब्रुवारी) बारामतीत साखर कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar on government bungalow) बोलत होते.
“बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्तानं मुंबईत येतात. त्यावेळी मी नाराज होतो. मुंबईतलं घर लहान आहे. सरकार स्थापनेला जवळपास 100 दिवस पूर्ण झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक, असा टोला बंगला न सोडणाऱ्या माजी मंत्र्याला अजित पवार यांनी लगावला.
“बारामतीकर मुंबईत आल्यावर आपण नाराज होत असतो. मुळात आताच घर लहान आहे. येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरुममध्ये बसवावं लागतं. आता तर माझ्या बेडरुममध्ये लोकांना बसवायचं राहिलंय”, असंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, “माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत गंमतीजमती करणाऱ्यांना आपण गमतीजमती केल्या तर कोणीही मदतीला येणार नाही”, असा सज्जड दमही अजित पवार यांनी दिला.
“माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करा, अन्यथा सिंगल वोटींगवर निवडून येणाऱ्या संचालकाचं जागेवर राजीनामा घेऊ”, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.
“निवडणुकीदरम्यान काहीजण गमतीजमती करतात. त्यांनी आता थांबावं अन्यथा आपण गमतीजमती सुरु केल्या तर मदतीलाही कोणी येणार नाही”, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.