मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. मंत्रिपदाची शपथ कधी घेणार, या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं.
अजित पवारांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे
– शपथ घेऊन फक्त 24 तास झाले आहेत, थोडा वेळ द्या
– नव्या सरकारला वेळ दिला पाहिजे
– राज्याची आर्थिक परिस्थिती ही सत्तेवर असणाऱ्यांना माहिती असते, विरोधकांना नाही
– मी मंत्रिमंडळात नाही, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्रीच सांगतील, मी मंत्रिमंडळात नसल्यामुळे त्याबद्दल सांगू शकत नाही.
– देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न
– मंत्रिपदाची शपथ कधी घेणार या प्रश्नावर उत्तर देणे अजितदादांनी टाळले