Ajit Pawar : उद्या तेच म्हणतील तुम्ही आमच्या 105 आमदारांमुळे मुख्यमंत्री आहात; अजित पवारांचा शिंदेंना खोचक टोला

| Updated on: Jul 04, 2022 | 1:44 PM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी करत, सत्ताधारी पक्षातील नेते तसेच बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. उद्या भाजपवाले म्हणतील की तुम्ही आमच्या 105 आमदारांमुळे मुख्यमंत्री आहात, असे देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटले आहे.

Ajit Pawar : उद्या तेच म्हणतील तुम्ही आमच्या 105 आमदारांमुळे मुख्यमंत्री आहात; अजित पवारांचा शिंदेंना खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारची (Shinde Government) बहुमत चाचणी पार पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे बहुमत सहज सिद्ध केले. दरम्यान यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली. सत्ताधारी पक्षातील नेते तसेच बंडखोर आमदारांवर त्यांनी निशाणा साधला. 40 आमदारांचा पाठिंबा असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते आणि 106 आमदार असलेली व्यक्ती मात्र उपमुख्यमंत्री होते. हे मनाला पटत नाही, यात नक्कीच काहीतरी  काळंबेरं असल्याची शंका येते. आमच्या 105 मुळे तुम्ही आज मुख्यमंत्री आहात असे देखील ते एखाद्यावेळी म्हणू शकतात. मनुष्यस्वभाव आहे, माणूस काहीही बोलतो. मात्र हे पण लक्षात ठेवा मुळचा शिवसैनिक कधीही बंडखोर नेत्यांबरोबर जात नाही. हा महाराष्ट्राचा आतापर्यंतचा इतिहास असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.

मी कोणावरही अन्याय केला नाही

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, भाजपा राज्यात शिवसेनेच्या मदतीने वाढले, शिवसेनेसोबत राहून भाजपाने आपली ताकद महाराष्ट्रात वाढवली. आघाडी असली तरी प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतच असतो. भाजप, शिवसेना युती देखील याला अपवाद नव्हती. पण शिंदे साहेब आजपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना कधीच बोललो नव्हतो, पण आज बोलतो. अनैसर्गिक युतीत आमच्यावर अन्याय झाला असा पाढा वाचण्याचे काम तुम्ही केले. मी काम करताना असा भेदभाव कधीच करत नाही. एक कोटी रुपये आमदार निधी होता, तो दोन कोटी मीच केला. आपण आल्याआल्या चार कोटी केला. त्यानंतर शिंदेसाहेब आपण एकत्र आल्यानंतर पाच कोटी केला. मी नगरविकास खात्याला कोट्यावधींचा निधी दिला. आपण खासगीत बोलत होतो. अजून नगरविकासला 1 हजार रुपये निधी देण्याबाबत बोलणं झालं होतं मग मी अन्याय कुठे केला असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या हितामध्ये आडकाठी आणणार नाही

राज्यात आता तुमचं सरकार आलं आहे, आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे तुम्ही जे राज्याच्या हिताच्यादृष्टीने निर्णय घ्याला त्याला आम्ही पूर्ण समर्थन करू, मात्र जर तुम्ही राज्याच्या हिताच्या विरोधात निर्णय घेल असाल, किंवा तुमच्या निर्णयामुळे जर राज्याचे नुकसान होणार असेल तर आम्ही त्याचा विरोध करू त्यासाठी तुटून पडू असा इशारा देखील पवार यांनी यावेळी दिला आहे.