अकोला : अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद निवडणुकीदरम्यान बाचाबाची झाल्याचे प्रकरण झाले. बाजारिया आणि भाजपचे माजी महापौर यांच्यात बाचाबाची झाली. बुथवर थांबण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आहे. अकोला मतदान केंद्रावर दोघांमध्ये बाचाबाची झाली.
अकोला-वाशिम-बुलडाणा निवडणुकीदरम्यान ही बाचाबाची झाली. गोपिकीशन बाजोरिया आणि भाजपचे माजी महापौर यांच्यात बुधवर थांबण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोघांनाही शांत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
मतदान केंद्रावर उपस्थित राहण्यावरून भाजपचे नगरसेवक विजय अग्रवाल आणि सेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आहे. या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. दरम्यान यावेळी भाजपचे इतर नगरसेवक आणि आमदार रणधीर सावरकर हे नगरसेवक अग्रवाल यांच्या बाजूने उपस्थिती झाले. मतदान केंद्रावर सुरू असलेला हा प्रकार शांत करण्यासाठी पोलिसांनी अतिशीघ्र दलास पाचारण केले आहे. यानंतर भाजपचे आमदार सावरकर यांनी मध्यस्ती करीत वाद मिटविला. अतिशिघ्र दलाने इतर नवरसेवकाना बाहेर काढले. दरम्यान, या घटनेमुळे मतदान केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती.
अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांत विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. यासाठी आज मतदान होणार असून यात 822 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात महाविकास आघाडीकडून गोपिकीशन बाजोरिया आणि भारतीय जनता पक्षाकडून वसंत खंडेलवाल हे दोन उमेदवार रिंगणात उभे असून या दोघांमध्ये लढत होणार आहे.
822 मतदारांसाठी तिने जिल्ह्यामध्ये आज मतदान होत आहे. यात अकोला जिल्ह्यात 7 मतदान केंद्र असून वाशीम जिल्ह्यात 4 मतदान केंद्र आहेत तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 11 मतदान केंद्र आहेत. यामध्ये अकोला जिल्हा परिषदमधील 60 सदस्य आणि पंचायत समिती सभापती तर अकोला महानगरपालिकेतले 81 नगरसेवक, अकोट नगर परिषद चे 36 सदस्य, तर तेल्हारा नगरपरिषद चे 19 सदस्य, तर बाळापूर नगर परिषदेचे 26 सदस्य, तर पातूर नगर परिषदेचे 19 सदस्य, तर मुर्तीजापूर नगर परिषदेचे 26 सदस्य आणि बार्शिटाकळी नगरपरिषदेचे 20 असे एकूण 140 सदस्य यात मतदान करणार आहेत.