मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Bhima Koregaon) यांनी केला. त्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवारांना नक्षलवाद्यांना वाचवायचं असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भीमा कारेगाव हिंसाचारवरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे (Vinod Tawade on Sharad Pawar and Urban Naxal).
विनोद तावडे म्हणाले, “शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचं आहे. त्यासाठी हा आटापिटा चालला आहे. एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्याच्या नादात आपण जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या पोलिसांवर अविश्वास दाखवतो. त्यांचं मनोबल आपण तोडतो. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार गृहमंत्री देखील राहिले आहेत. त्यांनी अशाप्रकारचं राजकारण करुन पोलिसांचं मनोबल तोडणं हे अतिशय दुर्दैवी आहे. किमान शरद पवारांकडून ही अपेक्षा नाही.”
शरद पवार यांच्या पत्राची दखल घेऊन कारवाई करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षाचे आमदार दीपक केसरकर यांना बोलवून विचारणा करावी. केसरकरांनी पाहिलेले पुरावे उद्धव ठाकरेंनीही पाहावेत आणि नंतर कारवाई करावी. आपल्या पोलिसांवर अविश्वास दाखवू नका, अशी शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे. तेच बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे करतील, असंही विनोद तावडेंनी नमूद केलं.
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात पवारांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
“भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडविलेले षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोप पवारांनी केला आहे.
“पोलिसांनीही अनेक पुरावे तोडून-मोडून सादर केले आहेत, असाही आरोप पवरांनी पोलिसांवर केला. माझे स्पष्ट मत आहे की तात्कालीन सरकारने पोलिसांसोबत मिळून षडयंत्र रचलेलं होते. तसेच हिंसा केलेल्या मुख्य आरोपींविरोधात गुन्हे दाखल न करता या प्रकरणावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला”, असंही पवारांनी पत्रात म्हटलं आहे.
“फडणवीस सरकारचे मुख्य उद्देश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबणे आणि लोकशाही आंदोलन अयशस्वी करणे हे होते. तसेच भीम कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्वलोक हे समाजातील सन्मानित नागरिक आहेत”, असं पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे 200 विजयी दिवस साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने दलित बांधव एकत्रित जमले होते. काही समाज कंटकांकडून भीमा कोरेगाव येथे मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला त्याचे रुपांतर दंगलीत झाले. या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. याच दंगलीबाबत काही गंभीर मुद्दे शरद पवारांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे उपस्थित केले आहेत.
संबंधित बातम्या:
कोरेगाव भीमा दंगल हे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र : सूत्र
शरद पवारांनी भीमा कोरेगावसंबंधी कागदपत्रं जाहीर करावी : प्रकाश आंबेडकर
भीमा कोरेगावप्रकरणी SIT चौकशी होणार : नवाब मलिक
भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘हा’ महत्त्वाचा आदेश
“आरेचं झालं, आता माझ्या सरकारनं भीमा कोरेगाव प्रकरणातील खोटे गुन्हे मागे घ्यावेत”
व्हिडीओ :