कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार त्यांच्याच ओझ्यानं पडेल असा दावा भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जातो. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. देशात आगामी काळातही मोदींचीच सत्ता असणार आहे. विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं. ती वेळ काही दिवसांची आहे, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय. इतकंच नाही तर विधान परिषद निवडणुकीत कोल्हापुरातून अमल महाडिक यांचा विजयाचा दावाही पाटील यांनी केलाय. (Amal Mahadik’s victory in Vidhan Parishad elections is certain, claims Chandrakant Patil)
विधान परिषदेसाठी 6 ठिकाणी 10 तारखेला निवडणूक होत आहे. महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. सहा वर्षांपू्र्वीची आणि आताची परिस्थिती यात फरक आहे. आवडे आणि कोरे मागच्यावेळी आमच्यासोबत नव्हते. आता ते आमच्यासोबत आहेत. या निवडणुकीतच नाही तर जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आमच्यासोबत आहेत. नवीन तयार झालेल्या नगरपालिकांमध्ये भाजपचं प्राबल्य आहे. 105 भाजप तर कोरे आणि आवडे यांचे मिळून 165 सदस्य होतात. बाकीची जुळवाजुळव सोपी आहे. कमी पडणारी 43 मतं यायला काही अडचण येणार नाही, असंही पाटील म्हणाले.
शिरोळच्या येथील यड्रावकर गटानं विधान परिषदेसाठी अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सतेज पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकी नंतर यड्रावकर गटानं निर्णय जाहीर केलाय. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू आणि जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यड्रावकर गट महाविकास आघाडीवर नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. विधान परिषद निवडणुकीतील निर्णयाक मतं यड्रावकर गटाकडं असल्यानं ते कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्षं लागलं होतं. अखेर सतेज पाटील यांना राजेंद्र पाटील यड्रावकर गटाची नाराजी दूर करण्यात यश आलं आहे.
भाजपनं कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघासाठी अमल महाडिक यांना उमदेवारी जाहीर करत तगडा उमेदवार दिला आहे. अमल माहडिक आज उमेदावारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजप आणि मित्रपक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. भाजपचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी पंचशील हॉटेल येथे एकत्र येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक वगळून होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी 420 मतदार आहेत. मात्र, जिल्हा परिषदेतील एक सदस्य अपात्र, तर एका सदस्याचं निधन झालं आहे. तसंच पन्हाळा नगरपालिकेतील एका स्वीकृत नगरसेवकाचं निधन झाल्यामुळे मतदारांची संख्या 417 वर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे ही यादी उद्या सादर केली जाणार आहे.
कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी महापालिकेतील 81 नगरसेवकाचं मतदान नाही. मात्र, नव्याने झालेल्या 5 नगरपालिकेतील निवडून आलेले नगरसेवक, नगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक असे 99 सदस्य मतदानासाठी पात्र असतील.
इतर बातम्या :
हे ठाकरे सरकार, कारवाई करताना गट तट पक्ष पाहत नाही, संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
Amal Mahadik’s victory in Vidhan Parishad elections is certain, claims Chandrakant Patil